ग्रामपंचायतींच्या ‘चौदाव्या वित्त’च्या खर्चाचा आजपासून पंचनामा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सांगली - चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात कुचराई करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘नायक’ सिनेमा स्टाईलने झटका देण्याची तयारी केली आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत  यांनी त्यासाठी प्लॅन आखला असून, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे उद्या (ता. ५) पासून या मोहिमेवर रवाना होत आहेत.

सांगली - चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात कुचराई करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘नायक’ सिनेमा स्टाईलने झटका देण्याची तयारी केली आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत  यांनी त्यासाठी प्लॅन आखला असून, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे उद्या (ता. ५) पासून या मोहिमेवर रवाना होत आहेत. निधी खर्च न झालेल्या गावच्या सरपंच, ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. पलूस, कडेगाव तालुक्‍यांपासून ही मोहीम सुरू होत आहे.

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग कासवगतीने होत असल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत. सन २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ या चार वर्षांतील सुमारे २६४ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. पैकी पहिल्या दोन वर्षांतील सरासरी ७० टक्‍क्‍यांवर निधी खर्ची पडला आहे. २०१७-१८ या वर्षातील निधी मात्र पडून आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींनी २५ टक्केही पैसे खर्च केले नाहीत. त्यात कारभारी विरुद्ध ग्रामसेवक वाद उफाळला आहे. काही ठिकाणी सत्तासंघर्षामुळे आडकाठ्या आल्या आहेत. त्यामुळे विकास खुंटला आहे. त्याबाबत सर्वसाधारण सभांमध्ये सदस्यांनी सतत आक्रमक भूमिका घेतली. त्याचा परिणाम म्हणून ग्रामविकास विभागाने ग्रामसेवक आणि थेट सरपंचांवर कारवाईचा बडगा उगारण्याची भूमिका घेतली आहे.

गावांत धावपळ
जिल्हा परिषदेने आक्रमक पवित्रा घेतल्याने ग्रामपंचायतींची धावपळ उडाली आहे. मंजुरी घेणे, निविदा काढणे आदी कामांना गती आली आहे. अनेक ठिकाणी राजकीय अडथळा पार करून लोक कामाला लागले आहेत.

Web Title: Grampanchyat expenditure issue