अक्कलकोट नगरपरिषदेस यात्रा अनुदान मंजूर 

approved
approved

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र शासनास पंढरपूर, तुळजापूर व इतर तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर यात्रा अनुदान देण्याची मागणी प्रस्तावाद्वारे मागणी केली होती. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आली आहे आहे. यामुळे सध्याच्या आहे त्या उत्पन्नात पायाभूत सुविधा देणे जड जात होते. यासाठी लोकसंख्येच्या धर्तीवर यात्रा अनुदान मिळण्याने नागरिकांनी सोयी सुविधा अधिक चांगल्या प्रकारे देण्यास मदत होणार आहे.

अक्कलकोट (जि. सोलापूर) या तीर्थक्षेत्रावर येणाऱ्या यात्रेकरुंना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे शक्य व्हावे, यासाठी अक्कलकोट नगरपरिषदेस 2018 - 2019 पासून यात्राकर अनुदान लागू करण्यास व त्यापोटी दरवर्षी 2 कोटी रुपये वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात नगरपरिषदांच्या क्षेत्रात यात्रास्थळे आहेत. या तीर्थक्षेत्रांवर येणाऱ्या यात्रेकरुंकडून संबंधित नगरपरिषदा यात्राकर वसूल करीत होत्या. राज्यातील त्र्यंबकेश्वर, आळंदी, जेजुरी, पंढरपूर,तुळजापूर व रामटेक या सहा नगरपरिषदांच्या क्षेत्रात 1977 - 1978पासून यात्राकर बंद करुन त्यापोटी त्यांना शासनाकडून यात्राकर अनुदान देण्यात येते. तर पैठण नगर परिषदेस 2007पासून यात्राकर अनुदान लागू करण्यात आले आहे.

यात्रेकरुंना मूलभूत सुविधा पुरविताना संबंधित नगरपरिषदांवर येणारा आर्थिक ताण कमी होण्यास यात्राकर अनुदानामुळे मदत होते. याच धर्तीवर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रावर येणाऱ्या यात्रेकरुंना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी 2018 - 2019 पासून यात्राकर अनुदान लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांची संख्या, क्षेत्रफळ,स्थानिक मागणी तसेच क्षेत्रीय अहवाल या सर्व बाबी विचारात घेऊन प्रतिवर्षी अक्कलकोट नगर परिषदेस दोन कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

या कामी नगराध्यक्षा शोभा खेडगी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने  कॅबिनेटमध्ये सदरचा विषय मंजूर करण्यात आलेला आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याचे क्षेत्र आहे . वर्षाभर भाविकांची मोठी गर्दी असूनही  पुरेश्या निधीअभावी विकासापासून वंचित असलेल्या या शहरातील लोकसंख्या व तरंगती भाविक संख्या हे पाहता त्या पध्दतीने समतोल विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. 

अक्कलकोटमध्ये दर गुरुवार, सलग सुट्ट्या, संकष्टी, पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, श्री प्रकट दिन, पुण्यतिथी सोहळा, विविध उत्सवाच्या काळात प्रचंड गर्दी होत असते. नगरपरिषद ही ब वर्ग असून खर्चाची मर्यादा यामुळे योग्य त्या सुविधा उत्सवाच्या काळात देऊ शकत नाही. याबाबत नगराध्यक्षा शोभा खेडगी यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मंजुषा म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कर लागु करण्याची मागणी केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे अक्कलकोट शहरातून स्वागत होत असून यामुळे शहरात समतोल विकास होण्यासाठी याची मदत होणार आहे.

शासनाकडे यात्रा अनुदानासाठी प्रस्तवाद्वारे मागणी केली होती. आज यासंबंधी मंजुरी मिळाल्याची माहिती मिळाली आहे. यात नेमका काय समावेश आहे आणि नेमकी निधी किती मिळणार याची माहिती मंजुरीचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच अधिक स्पष्ट माहिती समजेल.
- डॉ प्रदीप ठेंगल, मुख्याधिकारी

शासनाने खास बाब म्हणून इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे यात्रा काळात भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी यात्रा अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.तो स्वागतार्ह आहे यामुळे शहरात अधिक विकास कामे करण्यास मदत होणार आहे.
- शोभा खेडगी, नगराध्यक्षा, अक्कलकोट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com