साताऱ्यात शुक्रवारपासून पुस्तकांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

सातारा - सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीतर्फे २० वा ग्रंथमहोत्सव साताऱ्यात शुक्रवार (ता. चार) ते सोमवार (ता. सात जानेवारी) दरम्यान होणार आहे. त्याचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून, महोत्सवात अभिनेत्री ‘राणूआक्‍का’ फेम आश्‍विनी महांगडे उपस्थित राहणार आहे. यानिमित्ताने जिल्हावासीयांना पुन्हा एकदा पुस्तकांची मांदियाळी अनुभवता येणार आहे. 

समितीचे कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष वि. ना. लांडगे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, सुनीता कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

डॉ. पाटणे, श्री. चिटणीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील सर्वांत कमी खर्चात होणारा ग्रंथमहोत्सव म्हणून या ग्रंथमहोत्सवाची दखल महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतली आहे. सुमारे १२० स्टॉल उपलब्ध असणार असून, त्यात साहित्य अकादमीचीही पुस्तके उपलब्ध असतील. ता. चार रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडी राजवाडा ते गांधी मैदान ते तालीम संघ मैदानापर्यंत निघेल. तद्‌नंतर जिल्हा परिषद मैदानावर सर्व कार्यक्रम होतील. सकाळी ११ वाजता श्री. सबनीस यांच्या हस्ते व खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन होईल.’’

...असे असतील कार्यक्रम
शुक्रवार (ता. ४) - दुपारी २ वाजता : ढासळते पर्यावरण आणि युवकांसमोरील आव्हाने (परिसंवाद)   सायंकाळी ५.३० वाजता : नली-एकल नाट्यप्रयोग   सायंकाळी ७ वाजता : माझ्या खिडकीतून ‘ग. दि. मा.’ 

शनिवार (ता. ५) - सकाळी ८.३० वाजता : चला घडूया   सकाळी ११ वाजता : धमाल विज्ञानाची   दुपारी २.३० वाजता : महापुरुष असतात प्रकाशाची देवळे (परिसंवाद)  सायंकाळी ५ वाजता : पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींचा गीतांचा कार्यक्रम  सायंकाळी ७ वाजता : अभिनेत्री आश्‍विनी महांगडे यांची मुलाखत

रविवार (ता. ६) - सकाळी ८.३० वाजता : विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम  दुपारी २.३० वाजता : कृतज्ञता सोहळा   सायंकाळी ७ वाजता : एक धागा सुरांचा कार्यक्रम

सोमवार (ता. ७) - सकाळी ८.३० वाजता : कथाकथन   सकाळी ११ वाजता : इथे घडतात वाचक, वक्‍ते  दुपारी २.३० वाजता : वाचन संस्कृती (परिसंवाद)  सायंकाळी ५ वाजता - कवी संमेलन  सायंकाळी ७ वाजता : मंगल देशा, पवित्र देशा (संगीत कार्यक्रम)

Web Title: Granth Mahotsav