घरटी शौचालय नसणाऱ्या गावांचे अनुदान रोखणार - डॉ. भोसले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सांगली - जिल्ह्यातील १५० गावांत घरटी शौचालय न उभारल्यास संबंधित गावांचे सरकारी अनुदान, लाभांच्या योजनांपासून वंचित ठेवण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला. जत तालुक्‍यातील शौचालय नसलेल्या १४ हजार १४७ कुटुंबांना न्यायालयामार्फत नोटिसा देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील १५० गावे हागणदारीमुक्त झालेली नाहीत. त्या गावांना सरकारी अनुदान तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांचाही लाभ मिळणार नाही. 

डिसेंबर २०१६ अखेर राज्यातील १० जिल्हे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत. त्यात सांगली जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्हा हागणदारीमुक्तीसाठी ७१ हजार ५२ शौचालये बांधण्याचे टार्गेट होते. नोव्हेंबरअखेर ४२ हजार ७६५ शौचालये उभारण्यात आली आहेत. अनेकदा आवाहन करून तसेच विशेष मोहिमा राबवूनही २८ हजार २८७ कुटुंबांनी शौचालय बांधली नाहीत. वाळवा, आटपाडी, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ तालुके १५ डिसेंबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. 

डॉ. भोसले म्हणाले, ‘‘जत तालुक्‍यात सर्वाधिक १४ हजार १४७ कुटुंबांना शौचालय न बांधल्याबद्दल न्यायालयामार्फत नोटीस देण्यात येत आहेत.’’

स्वच्छ भारत मिशन, शौचालय नसलेली तालुकानिहाय कुटुंबे अशी-

तालुका,            कुटुंबे  
वाळवा,           १६५३
आटपाडी,         १८४८
तासगाव,          १४४२
शिराळा,           १८४२
कवठेमहांकाळ,   १५०७
मिरज,            ५८०८
जत,           १४१४७
एकूण         २८२८७

Web Title: Grants to occur under the toilet villages