परप्रांतीय मजूरा अभावी द्राक्ष बागायतदार अडचणीत 

सचिन निकम 
Friday, 4 September 2020

लेंगरे (सांगली)- पावसाच्या उघडझापीमुळे द्राक्षबागायतदार शेतकर्याची बागेची कामे लांबणीवर पडली आहेत. द्राक्ष बागायतदारांचे द्राक्ष हंगामाची तयारी सुरू झाली आहे. परंतु कोरोनाच्या धास्तीने परप्रांतीय मजूर आपल्या गावाकडे गेल्याने द्राक्ष बागातील कामासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.परिसरातील देविखिंडी,माहुली, पळशी,बलवडी,मंगरूळ या द्राक्ष पट्ट्यात बिहार,उत्तर प्रदेशातील मजूर दरवर्षी द्राक्ष बागेतील कामासाठी येतात.मात्र कोरोनामुळे या मजुरांनी या भागाकडे पाठ फिरवल्याने द्राक्षबागायतदारांची गोची झाली आहे.

द्राक्ष बागेच्या छाटणी पासून द्राक्षे काढणीपर्यंत सर्व कामे ही मजुर कामे करतात.बिहार,उत्तर प्रदेशसह विर्दभातील नाशिक जिल्ह्यातून येणारे मजुर देविखिंडी,कलेढोण भागात दाखल झाले आहे.द्राक्षबागेची ही प्रमुख कामे स्थानिक मजुरांकडून ही कामे करुन परवडत नसल्याने या परप्रातीय मजुरांना द्राक्षबागायतदार शेतकर्याकडून मागणी असते.या परप्रांतीय मजुरांची जुळवाजुळव करण्याचे काम ठेकेदार करतात.तसेच बाहेरुन येणार्या मजुरांची द्राक्ष बागायतदारांची सांगड घालण्याचे काम हे ठेकेदार करतात.

परप्रांतातून येणारे हे मजुर एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजारांपर्यंत ठेका पद्धतीने ठरवून घेतात.त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना रोज मजुरांचा शोध घेण्याची गरज पडत नाही .या मजुरांकडून द्राक्ष बागांची कामे वेळेत होतात. पण यावर्षी कोरोनामुळे चार महिन्यांपूर्वीच मजूर गावाकडे गेले आहेत .मजूर अजूनही तालुक्यात आले नाहीत. मजूर आले तरी त्यांना लॉकडाऊन अडचणी होणार आहेत. पुढील पंधरवड्यापासून फळ छाटणी सुरू होणार आहे.पाऊस,हवामानाचा अंदाज घेऊन छाटणी पूर्वमशागत करू लागले आहेत.परप्रांतीय मजुरांसाठी मजुरांच्या ठेकेदारांशी संपर्क सुरू झाला आहे.तालुक्‍यातील सुमारे सातशे एकर द्राक्षाचे क्षेत्र परप्रांतीय मजुरांवर अवलंबून आहे.गेल्या हंगामा द्राक्ष बागेची छाटणी आगामी न घेता एक महिना उशीरा म्हणजेच आँक्टोबर मध्ये छाटणीचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

द्राक्षबागेच्या सर्व कामासाठी बाहेरुन येणार मजुरांकडून कामे करुन घेणे द्राक्ष बागायतदारांना अधिक परवडते.देवविखिंडी परिसरात नाशिक भागातील मजुर दाखल आहेत.गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आगाप हंगाम न धरता एक महिना म्हणजेच आँक्टोबर महिन्यातील छाटणीस प्राधान्य दिले जातात आहे.आधीच यंदाच्या हंगामात कोरोनामुळे दर पडल्याने कबरंडे मोडले.यंदाच्या हंगामाने साथ दिल्यास बागायतदार उभारीस येतील.
सुभाष निकम,द्राक्षबागायतदार देविखिंडी

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grape growers in trouble due to lack of other state labor