Grape shopping breaks; Manufacturers turned to the raisin
Grape shopping breaks; Manufacturers turned to the raisin

द्राक्ष खरेदीला ब्रेक; उत्पादक वळले बेदाण्याकडे 

पलूस : सुरुवातीला महापूर, त्यानंतर अवकाळी पाऊस आणि आता कोरोनाची साथ यामुळे द्राक्षबागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. व्यापारी आणि दलाल यांनी द्राक्षखरेदी आणि दरावर मर्यादा आणल्याने द्राक्षाचे करायचे काय असा प्रश्न द्राक्षबागायतदारांपुढे पडला आहे. शरद सिड्‌लेस ( काळी द्राक्षे) द्राक्षाचाही बेदाणा तयार करण्याची वेळ द्राक्षबागायतदारांवर आली आहे.

पलूस, तासगाव, वाळवा आणि खानापूर तालुक्‍यात द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी लहरी निसर्गाने द्राक्षबागायतदारांची सुरुवातीपासून पाठ सोडली नाही. अगदी द्राक्ष छाटणीच्या अगोदर महापूर आणि भयंकर पाऊस पडला.त्यानंतर छाटणीनंतर अवकाळी पावसाने गाठलं.त्यामध्ये अनेक द्राक्षबागा डाऊनी आणि ईतर रोगाचे बळी ठरल्या.तर काही बागांना कमी प्रमाणात पीक शिल्लक राहिले. 

काही द्राक्षबागायतदारांनी पाऊस उघडल्यावर पीक छाटणी घेतली. त्या बागांना जरा बर्यापैकी पीक आले. एकरि लाखो रुपये खर्च करून , लहरी निसर्गावर मात करुन द्राक्षाचे पीक घेतले.यावर्षी द्राक्षे कमी प्रमाणात असल्याने द्राक्षाला दरही समाधानकारक मिळेल. अशी अपेक्षा द्राक्षबागायतदारांना होती.णसा दर मिळतही होता. द्राक्षाला चांगली मागणी देशाच्या बाजारपेठेत होती.दिल्ली, बैगलोर, हैदराबाद, बेळगाव, मद्रास, मुंबई, पुणे, कोलकाता व देशाच्या ईतर ठिकाणाहून व्यापारी व दलाल द्राक्षे खरेदी करित असतात.द्राक्षाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. 

द्राक्षबागायतदार चांगल्या दराच्या अपेक्षेत असतानाच कोरोना साथ संपूर्ण देश आणि बाहेरिल देशात आल्याने द्राक्षबागायतदारांच्या आशेवर पाणी फिरले आहे. सद्या बाजारपेठा बंद आहेत. याचाच गैरफायदा व्यापारी आणि दलालांनी घेण्यास सुरुवात केली आहे. अगदी दर्जात्मक द्राक्षेही कमी दराने खरेदी करण्याचा सपाटा व्यापारी व दलालांनी लावला आहे. द्राक्ष खपवायची कुठे असे म्हणून कमी प्रमाणात द्राक्षे खरेदी केली जात आहेत. 

व्यापारी व दलालांनी कोरोनाचे नावाखाली द्राक्षाचे करायचे काय , असा प्रश्न द्राक्षबागायतदारांना पडला आहे. द्राक्षे काढणीला आली आहेत. तर काही ठिकाणी मणी गळ सुरू झाली आहे. शरद सिड्‌लेस सारखी द्राक्ष सुकु लागली आहेत. त्यामुळे नाईलाजाने द्राक्षाचा बेदाणा तयार करण्यास द्राक्षबागायतदारांनी सुरुवात केली आहे. यामध्ये मोठा तोटा सहन करावा लागत आहे. 

वाहणेही जाग्यावर 
द्राक्षाचा हंगाम सुरू झाल्यावर टेम्पो व ईतर वाहनांना द्राक्ष वाहतूकीचे काम मिळते.पण यावर्षी कोरोनाची साथ सर्वत्र सुरू आहे.त्यामुळे द्राक्षाची वाहतूकही कमी आहे. द्राक्षबागायतदारांबरोबरच वाहनधारकांनाही कोरोणाचा फटका बसला आहे. असे टेम्पो धारक सुरेश पुदाले यांनी सांगितले. 

नाईलाजाने बेदाणा करण्यास सुरुवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत द्राक्षाला कमी उठावाचे कारण पुढे करुन व्यापारी आणि दलालांनी लूट सुरू केली आहे.द्राक्ष खरेदी केली जात नाही. त्यामुळे वेलीवर च द्राक्षे सुकुन निघाली. प्रती चार किलोस 280 रुपये दराने एका व्यापार्यांने द्राक्षे नेण्याचे मान्य केले होते. आता कोरोनाचे कारण पुढे करुन द्राक्षे काढण्यास नकार दिला. नाईलाजाने मी आता शरद सिड्‌लेस ( काळी द्राक्षे ) द्राक्षाचा बेदाणा तयार करण्यास सुरुवात केली आहे. 
- संदिप अशोक वाकसे, द्राक्षबागायतदार , बोरगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com