जिल्ह्यातून यंदा द्राक्ष निर्यात वाढणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

काशीळ - जिल्ह्यातून यंदा द्राक्ष निर्यातीत वाढ होणार आहे. निर्यातक्षम बागांची आतापर्यंत ४७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, सुमारे पाच ते साडेपाच हजार टन द्राक्ष निर्यात होऊ शकते, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

काशीळ - जिल्ह्यातून यंदा द्राक्ष निर्यातीत वाढ होणार आहे. निर्यातक्षम बागांची आतापर्यंत ४७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, सुमारे पाच ते साडेपाच हजार टन द्राक्ष निर्यात होऊ शकते, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यात खटाव तालुक्‍यात सर्वाधिक द्राक्ष लागवड केली जाते. यामुळे या तालुक्‍यातून निर्यातही सर्वाधिक केले जाते. या तालुक्‍यामध्ये द्राक्षाबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वेळा टॅंकरने पाणी द्यावे लागते. सध्याही दुष्काळाच्या झळा वाढल्या असल्यातरी शेतकऱ्यांची बागा जगविण्या-साठी धडपड सुरू आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यातून ४१५ बागांची नोंद झाली होती. या बागांमधून साडेचार टन द्राक्ष निर्यात झाली होती. यंदा नोंदणीत चांगली वाढ झाली असून, जिल्ह्यात ४५० बागांची नोंदणी झाली आहे. बागांची नोंदणी संख्या बघता खटाव तालुक्‍यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. त्यानंतर फलटण, सातारा व माण तालुक्‍यांतून नोंदणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३८४ इतकी नोंदणी खटावमध्ये झाली आहे. 

या सर्व शेतकऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्रे दिलेली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव यांनी दिली. या हंगामामध्ये बागांच्या संख्येत वाढ झाली असल्याने जिल्ह्यातून पाच हजार टनापर्यंत द्राक्ष निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.

Web Title: Grapes Export Increase in District