सांगली : जाखापूर, कुची परिसरात द्राक्ष, फळबागांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादळी पावसाने द्राक्ष बागेचे झालेले नुकसान.

सांगली : जाखापूर, कुची परिसरात द्राक्ष, फळबागांचे नुकसान

घाटनांद्रे - ऐन उन्हाळ्यात शनिवारी सायंकाळी वादळी वारे व गारपिटसह झालेल्या वादळी पावसाने जाखापूर, कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील घरांबरोबर द्राक्ष व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यात खरड छाटणी झालेल्या अनेक द्राक्ष बागांच्या काड्या मोडून पडल्या आहेत. आंबा भुईसपाट झाला आहे. कुची येथील माळी वस्तीवरील सुमारे दहा ते बारा शेतकऱ्यांच्या द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. सचिन सावंत माळी, नामदेव सावंत माळी, विठ्ठल सावता माळी, राहुल शिवाजी माळी, विलास ईश्वर माळी, विजय ईश्वर माळी, लक्ष्मण शिवराम माळी, रामदास शिवराम माळी या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काही दिवसांपासून अवकाळी, वादळी वाऱ्याच्या संकटाने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडत आहेत. नुकसानीनंतर नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहे. कुची, जाखापूरमध्ये जोरदार वादळीवाऱ्यासह गारपीट झाल्याने फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी मोठ्या पावसाने सुरुवात केली. या पावसात गारपीट व वाऱ्याचा प्रवाह जोरात असल्याने आंबा ही भुईसपाट झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करीत आहेत.

Web Title: Graps Damage To Orchards In Sangli Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..