वृक्षारोपण, संवर्धनासाठी ग्रीन आर्मी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्ह्यात ग्रीन आर्मी संकल्पना प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्‍ला यांनी आज येथे दिली. गांधीनगर येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या मैदानावर सत्‌गुरु बाबा ईश्वरगाह साहिबजींच्या अवतीर्ण दिनानिमित्त गांधीनगर येथील हरे माधव परमार्थ सत्संग समितीतर्फे वृक्षारोपण अभियानाचा प्रारंभ उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्‍ला यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाला.

श्री. शुक्‍ला म्हणाले, ""वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या कामात जनतेने घेतलेला लोकसहभाग अतिशय मोलाचा आहे. यासाठी सत्संग समितीने सक्रिय होऊन आगामी काळात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात योगदान द्यावे. जिल्ह्यातील वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या कामास अधिक गती देण्यासाठी ग्रीन आर्मी उपक्रमाद्वारे दक्षता घेतली जाणार आहे.''

सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक तानाजी पाटील म्हणाले, "वृक्षारोपणासाठी रोपांची निर्मिती करण्याचे काम सामाजिक वनीकरणाने हाती घेतले आहे.'' माहिती अधिकारी एस. आर. माने म्हणाले, ""भविष्यात सुरक्षित, संतुलित आणि संवर्धीत पर्यावरणासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे आहे. वनसंवर्धनासाठी आता लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. तरच, हरित आणि समृध्द महाराष्ट्राचे स्वप्न साकार करुया.''

आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कदम, मुख्याध्यापक विजय शिंदे तसेच हरे माधव परमार्थ सत्संग समितीचे अध्यक्ष खमीचंद नागदेव यांची समयोचित भाषणे झाली. या वेळी, गोवालदास दुल्हानी, लख्मीचंद वर्ल्याणी, इन्दर हिरानी, मनोहरलाल चैनानी, विश्वजित जाधव, मुख्याध्यापक विजय शिंदे, हरे माधव परमार्थ सत्संग समितीचे अध्यक्ष लखमीचंद नागदेव आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Green army for Plantation