पर्यावरणपूरक होळी

पर्यावरणपूरक होळी

कोल्हापूर - होळीचा आनंदोत्सव साजरा करताना यंदाही कोल्हापूरकरांनी पर्यावरणाचा जागर मांडला. विविध संस्था, संघटना आणि सेवाभावी व्यक्तींनी पंचगंगा स्मशानभूमीकडे तीन लाखांवर शेणी सुपूर्द केल्या. काल दिवसभरात एकूण दोन लाख 73 हजार 764 इतक्‍या शेणी स्मशानभूमीकडे जमा झाल्या. आज दिवसभरातही विविध संस्थांनी शेणी सुपूर्द केल्या. एकूण दोन लाख 81 हजार 314 शेणी स्मशानभूमीकडे आल्या. 

दरम्यान, जिल्ह्यात पारंपरिक उत्साहात होळीचा सण साजरा करताना सार्वजनिक तरुण मंडळांनी होळी लहान करण्यावर भर दिला. अनेक मंडळांनी डांबरी रस्ता खराब होऊ नये, म्हणून रस्त्यावर पत्रे अंथरून त्यावर होळी साजरी केली. 

शिवाजी पेठेतील अचानक तरुण मंडळाने यंदाही स्मशानभूमीकडे 51 हजार शेणी सुपूर्द केल्या. आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. उपमहापौर अर्जुन माने, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, महापालिका विरोधी पक्षनेते किरण शिराळे, परिवहन समिती सदस्य सुहास देशपांडे, नगरसेवक महेश सावंत, अजित ठाणेकर, आदिल फरास, आर. डी. पाटील, परीक्षित पन्हाळकर, अजित राऊत, सुजित चव्हाण, अभय देशपांडे, परांजपे स्किम्सचे आनंद पराडकर, जयवंत हारुगले आदी उपस्थित होते. 

अवनि संस्थेतर्फे पोळीदान 
अवनि संस्थेच्या वतीने केलेल्या पोळीदानाच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून हजारहून अधिक पोळ्या संकलित झाल्या. वाकरे, दोनवडे, साबळेवाडी, सरनोबतवाडी, शिरोली जकात नाका येथील वीटभट्टीवरील मुलांना त्या देण्यात आल्या. साताप्पा मोहिते, अमोल कवाळे, वैशाली कांबळे, सविता कांबळे, दीपाली दिवसे, मनीषा कांबळे, ऊर्मिला संकपाळ, आरती रवटे, सुजाता हरबोल आदींनी संयोजन केले. 

शिवाजी मराठा हायस्कूलचे पोळीदान 
शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरातून पोळ्या संकलित केल्या. स्त्री भ्रूणहत्या, व्यसनाधीनतेच्या विचारांची होळी करण्याची प्रतिज्ञा या वेळी घेण्यात आली. उदय संकपाळ प्रमुख उपस्थित होते. संकलित झालेल्या एक हजारावर पोळ्या वीटभट्टीवरील मुलांना देण्यात आल्या. कलाशिक्षक मिलिंद यादव, आरती सोनवणे, ऐश्‍वर्या चोगले, राहुल कांबळे, नीलेश झेंडे, शिवा खादी, आदित्य नवाळे, नेहा कुकडे, स्पर्श लाड आदींनी संयोजन केले. सविता प्रभावळे, प्रशांत पोवार या वेळी उपस्थित होते. 

पंचगंगा स्मशानभूमीकडे जमा झालेल्या शेणी अशा 
- शारंगधर देशमुख (एक लाख), अचानक तरुण मंडळ (51 हजार), मानसिंग पाटील प्रेमी ग्रुप - फुलेवाडी (51 हजार), हस्तिनापूर नगरी - रामकृष्ण नगर (आठशे), उदय राजाराम माळी (एक हजार), जायंटस्‌ ग्रुप ऑफ रंकाळा (तीन हजार), यंगस्टार स्पोर्टस्‌ क्‍लब (दोन हजार), दिगंबर सोनटक्के (सातशे), सम्राट फ्रेंडस्‌ सर्कल (11 हजार 111), नेहरूनगर फ्रेंडस्‌ सर्कल (सहाशे), शिवनेरी कॉलनी (पाचशे), कृष्ण अंगण मित्र मंडळ (सात हजार), जय जवान फेकणे मंडळ (पाच हजार), भारतीय जनता पक्ष - लक्ष्मीपुरी (सहाशे), भेंडे गल्ली गणेश मंडळ (15 हजार), लक्ष्मी गल्ली तरुण मंडळ (दोन हजार), समर्थ रवींद्र शिंदे-अभिजित कालेकर (पन्नास), मशाल युवा मंच (दोन हजार), महेंद्र चौहान (251), महादेव बळवंत राणे (15 हजार), जय शिवराय सांस्कृतिक सर्कल (अकराशे), राजाबळ पान मंदिर (501), शिवगर्जना मित्र मंडळ (एक हजार एक), गवळी ऍटो गॅरेज (एक हजार), चॅलेंज स्पोर्टस्‌ (अडीच हजार), लक्षतीर्थ विकास फौंडेशन (चार हजार), दि प्रिन्स क्‍लब गंगावेस (साडेतीनशे), इंद्रप्रस्थ स्पोर्टस्‌ (तीनशे), शिवराज मंडळ (पाच हजार), रोहन डेकोरेशन (एक हजार), बाल गणेश मंडळ (साडेपाचशे), गजलक्ष्मी पार्क - युवक क्रांती दल (एक हजार). 

गीता हासूरकर यांच्या पुढाकाराने पोळीदान उपक्रम 
सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या गीता हासूरकर यांच्या पुढाकाराने होळीनिमित्त "होळी लहान पोळी दान' हा उपक्रम राबवण्यात आला. होळीचा सण सर्वत्र पुरणपोळीचा नैवेद्य करून साजरा केला जातो. होळीमध्ये पोळी भक्तीभावाने अर्पण केली जाते. मात्र, नैवेद्य म्हणून पोळी अर्पण करण्यापेक्षा ती गरजूंना दिली पाहिजे, या भावनेतून त्यांनी हा उपक्रम राबवला. हासूरकर यांनी त्यासाठी विविध संस्थांना आवाहनही केले होते. त्याला प्रतिसाद देत हेल्पींग हॅंड फौंडेशनच्यावतीने सीमा सावंत, श्रध्दा राणे, जरग फौंडेशनच्या वैभवी जरग यांनी साडेतीनशेहून अधिक पोळ्या संकलित केल्या. आंबेवाडी परिसरातील क्रॉस पॉईंट मंडळाचे आशिष पाटील, प्रशांत पाटील आदींनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. संकलित झालेल्या पोळ्या भवानी मंडप, अंधशाळा आदी ठिकाणी गरजूंना वितरित करण्यात आल्या. 

शारंगधर देशमुख यांच्याकडून सव्वालाख शेणी दान 
महानगरपालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव मंडळातर्फे महापालिकेच्या स्मशानभूमीस सव्वा लाख शेणी व शेणी खरेदीसाठी चाळीस हजार रुपये रोख देण्यात आले.नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने यांच्याकडे सव्वा लाख शेणी दान केल्या तर स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांच्याकडे शेणी खरेदीसाठी चाळीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी नगरसेविका दीपा मगदूम, वनिता देठे, अभिजीत चव्हाण, महादेव मोरे, खंडेराव जाधव उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com