ग्रीन माणदेश उपक्रमाची भांडवलीतून सुरुवात

रुपेश कदम 
मंगळवार, 10 जुलै 2018

मलवडी - "आपला माण, ग्रीन माण" अशी घोषणा देत ग्रीन माणदेश या चळवळीची सुरुवात भांडवली (ता. माण) येथे करण्यात आली.

माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी चला फेडूया मातीचे ऋण, चला करुया ग्रीन माण-खटाव असा संदेश देत वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत माण-खटावमधील अनेक गावात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात जलसंधारणासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या भांडवली गावातून करण्यात आली. 

यावेळी ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या हर्षदा देशमुख-जाधव, माणदेश फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकराव माने, महेशगिरी महाराज, भांडवलीचे उपसरंपच सुनिल सुर्यवंशी, सुनिल बाबर, अभयसिंह जगताप, रमेश शिंदे, हेमंत निंबाळकर, संदिप सुळे, डाॅ. प्रदीप पोळ, रावसाहेब देशमुख, प्रशांत विरकर, विशाल घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या की, मागील वर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्ष माझा सखा ही वृक्षारोपणाची संकल्पना सुरु करण्यात आली. त्याचेच पुढचे पाऊल ग्रीन माणदेश ही चळवळ आहे. माण-खटाव मध्ये जलसंधारणाची खुप चांगली कामे झाली आहेत. आता जलयुक्त प्लसकडे जाताना वृक्षारोपण अत्यंत महत्वाचे आहे. जलसंधारणात भांडवलीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता वृक्षारोपणाचा आदर्श निर्माण करायचा आहे. आपल्या पुढच्या पिढीला चांगली फळ चाखता यावी म्हणून आपण फळझाडांची रोपं आपण लावणार आहोत.

अशोकराव माने म्हणाले की, माण तालुक्यात महाबळेश्वरची अनुभती घेता येईल असं वातावरण निर्माण करायचा काम भांडवलीत सुरु आहे. या कामात आमचाही सहभाग असावा म्हणून आम्ही वृक्षारोपणाच्या उपक्रमाची येथे सुरुवात करत आहोत. प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतील संपुर्ण माणदेशाने आदर्श घ्यावा असं वृक्षारोपणाचं काम आपण भांडवलीत करुया.

यावेळी ड्रीम सोशल फाऊंडेशन, माणदेश फाऊंडेशन यांनी भांडवली गावास आंबा, सिताफळ, चिंच, नारळ आदी एक हजार रोपे मोफत दिली. महेशगिरी महाराज यांचे हस्ते गोपालनाथ मठात व मान्यवरांच्या हस्ते डोंगराला वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Web Title: The Green Mandesh initiative started from the bhandwali