अमृत योजनेंतर्गत शहरात चार ठिकाणी हरितपट्टे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

सोलापूर - अमृत योजनेंतर्गत शहरात चार ठिकाणी हरितपट्टे तयार केले जाणार आहेत. त्यासाठी एक कोटी ४३ लाखांची तरतूद केली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे.

केंद्र सरकारने हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २२ मार्च २०१७ ला विशेष आदेश जारी केला आहे. सोलापूर शहरात हा प्रकल्प राबविण्यासाठी कोल्हापुरातील इनग्रच आर्किटेक्‍ट्‌स यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार त्यांनी प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागांची माहिती, आरक्षणांची माहिती मागितली आहे. 

सरकारचा सुधारित आदेश आल्यामुळे यापूर्वी अमृत योजनेंतर्गत प्रकल्प प्रस्ताव तयार केलेले एन्विरोसेफ कन्सल्टंट यांना दिलेला कार्यादेश रद्द करून सरकारने नियुक्त केलेल्या नव्या कंपनीकडून ही कामे करून घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी प्रकल्प किमतीच्या दीड टक्के शुल्क महापालिकेने कंपनीस देणे आणि करारपत्र करून त्यांना कार्यादेश देण्याबाबत हा प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर शुक्रवारी (ता. २६) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत निर्णय अपेक्षित आहे.

Web Title: Greenpeace in four places in the city under amrut yojana