वाळव्यात पावसाचा परिणाम द्राक्षबागा संकटात

Sangli In The district Acre Vineyard In Crisis४००
Sangli In The district Acre Vineyard In Crisis४००

वाळवा (सांगली) : आठवडाभरात काढणीला येणारी सुमारे ४०० एकरांतील द्राक्षे आजच्या पावसामुळे संकटात सापडली आहेत. पावसामुळे द्राक्षाच्या घडात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. महापूर, अतिवृष्टीच्या तडाख्यातून येथील शेतकऱ्यांनी  अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत द्राक्षबागा टिकवल्या आहेत. अशा द्राक्षबागांना या पावसाने मोठा फटका बसला आहे.

यंदाचा द्राक्ष हंगाम येत्या आठवड्यात सुरू होईल. यंदा द्राक्षासाठी उत्पादन खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. सरसकट दोन ते अडीच लाखांची औषधे वातावरण चांगले असताना द्राक्षबागेला लागतात. यंदा अनेक शेतकऱ्यांनी प्रतीएकरात ५ लाखांवर खर्च केला आहे. एवढा खर्च करूनही पावसाने पीक हातात येण्याची शक्‍यता दिसत नाही.

ढगाळ वातावरणामुळे घड कुजण्याची शक्‍यता

सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक छाटणीनंतर महिनाभर अहोरात्र प्रयत्न केले. मात्र कीड व रोग नियंत्रणात येत नसल्यामुळे अनेकांनी द्राक्षबागा सोडल्या आहेत. त्यामध्ये अनेक प्रस्थापित शेतकऱ्यांचा समावेश आहे. दोन दिवस ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पक्व झालेल्या पावसाचे घड कुजण्याची शक्‍यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागांचे सौदे पूर्ण केले आहेत. मात्र आजच्या पावसाने व्यापारी ठरलेला दर देतील का नाही या चिंतेत शेतकरी आहेत.

अतिवृष्टीचा फायदा व्यापारांना  

अनेक शेतकऱ्यांनी प्रती ४ किलो द्राक्षाला ५०० रुपये दराने व्यापारांशी करार केले आहेत. २००५ पासून दरवर्षी द्राक्ष बागांना अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. नेमक्‍या या बाबींचा फायदा दरवर्षी व्यापारी उठवतात. परिणामी उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याची परिस्थिती आहे. परिसरात कालपासून ढगाळ वातावरण आहे.

द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले

आज सकाळी हलका पाऊस झाला. पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. रात्रंदिवस औषध फवारणी सुरू आहे. जवळपास ९० दिवस पूर्ण झालेल्या ४०० एकरांतील द्राक्षबागा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com