दळप-कांडपाच्या दरात नऊ वर्षांनी दरवाढ 

दळप-कांडपाच्या दरात नऊ वर्षांनी दरवाढ 

कवलापूर ः येथील गिरणी व्यवसायिकांना एक जानेवारीपासून दळप, कांडप दरात वाढ केली आहे. दळपाच्या दरात एक रुपया वाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वीचा दळप दर तीन रुपये होता. तो वाढवून चार रुपये किलो असा करण्यात आला आहे. त्यांची अंमलबजावणीही सुरू करण्यात आलेली आहे. दळप, कांडप संघटनेने हा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2011 रोजी यापूर्वीची दरवाढ करण्यात आली होती. तब्बल नऊ वर्षांनी ही दरवाढ करण्यात आली आहे. 

राज्य दळप, कांडप चालक-मालक संघटनेने दरवाढीचा निर्णय जाहीर केला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबनराव क्षीरसागर आहेत. कवलापूर संघटनेचे अध्यक्ष सचिन सलगरे, उपाध्यक्ष वैभव पाटील आहेत. राज्य संघटनेने हा व्यवसाय शेतीपूरक समजावा, औद्योगिकमध्ये समावेश करू नये अशी मागणी आहे. घरगुती पिठाच्या गिरणीमुळे मूळ गिरणी मालकांवर गंडांतर येत असून गिरणी मालक महापालिकेची परवाना फी भरतात त्याच धर्तीवर घरगुती गिरण्यांनाही परवाने लागू करावेत. दळप कांडपामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतून राहते. याउलट घरगुती चिक्कीवाले कमी भांडवलात व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना सर्व प्रकारचे परवाने लागू करावेत, अशी मागणी आहे. 

कवलापुरात वीस व्यावसायिक आणि गावची लोकसंख्या वीस हजारांच्या घरात आहे. गावातील व्यावसायिक प्रकाश पाटील, देवदास बनसोडे, राजकुमार झेंडे, विश्‍वनाथ माळकर, हिंदुराव माळी, प्रभाकर नलावडे, वैभव पाटील, प्रदीप पवार, रणजित निंबाळकर, बाबुराव पाटील, सुनीता माळी, अशोक मुळे आदी सदस्य आहेत.

  • सर्व प्रकारचे दळप व भरडणे-4 रुपये किलो
  • मक्का दळण-10 रुपये
  • पॉलिश करणे-8 ते 10 रुपये
  • खपली-साळी भरडणे- 40 रुपये
  • मिरची कांडप- 45 रुपये किलो 


वीज बिलात मोठी वाढ झाली आहे. यंत्रसामग्रीचा देखभाल दुरुस्तीच्या खर्चात वाढ झाली आहे. यामुळे व्यवसाय मजुरीवर आहे. दळपाच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही. सध्या किलोमागे तीन रुपये इतका दर आहे. एक जानेवारीपासून गहू, जोंधळा, तांदूळ, डाळीच्या दळपामागे एक रुपया अर्थात चार रुपये दर करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. 
- सचिन सलगरे, अध्यक्ष. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com