किराणा मालही ॲपवर

संभाजी गंडमाळे
सोमवार, 2 जुलै 2018

कोल्हापूर - पाच रुपयाची साखर, पावशेर तांदूळ असा रोजचा किराणा आणणारा वर्ग आजही समाजात असला तरी आता बदलावर स्वार होत येथील पाटील दाम्पत्याने किराणा मालासाठीही मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. ‘कोल्हापूरचं डिस्काउंटसिटी’ नावाचे हे ॲप असून, त्याला अल्पावधीतच प्रतिसाद मिळू लागला आहे. सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या दिग्विजय पाटील आणि ‘एमबीए’ असणाऱ्या त्यांच्या पत्नी सुलभा यांनी ही अभिनव संकल्पना मार्केटमध्ये आणली आहे. दरम्यान, कोल्हापूर आणि परिसरातील कोणत्याही भागात एक हजाराच्या खरेदीवर फ्री होम डिलिव्हरी सुविधाही दिली जाणार आहे. 

प्रत्येक घर आणि किराणा मालाचं दुकान हे एक अतूट समीकरण. त्यातही कोल्हापूरसारख्या शहरात महिन्याचा किराणा एकाचवेळी भरणारा जेवढा वर्ग आहे, तेवढाच रोजच्या रोज लागणारा, तसेच किराणा आणणारा वर्गही मोठा आहे. भले मोठे मॉल, सुपरमार्केटस सुरू झालीतरी किराणा दुकानांचे महत्त्व आजही तितकेच मोठे आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर मोबाईल ॲपच्या माध्यमातून किराणा घराघरांत पोचवण्याची धाडसी संकल्पना पाटील दाम्पत्याने आणली असून, सुरवातीला रोज दोन ते तीन ऑर्डर त्यांच्याकडे येऊ लागल्या आहेत. 

‘सगळं काही घरच्या घरी..ट्रॅफिक नाही, उन्हाच्या झळा नाहीत, बिलाची लाईन नाही आणि सगळं काही डिस्काऊंटमध्ये’ अशी टॅगलाईन घेऊन हे ॲप आता सर्वत्र पोचू लागले आहे. धान्य, डाळी, तेल, मसाले, कॉफी आणि इतर ड्रिंक्‍स, बिस्किटस्‌ व इतर खाद्यपदार्थ, लहान मुलांचे प्रॉडक्‍टस्‌, कपड्यांची व घरांची स्वच्छता अशा विविध विभागांतर्गत खरेदीसाठी करता येते.

ऑनलाईन खरेदीचा व्यवहार जमत नसेल, तर नाव आणि नंबर टाकल्यास फोनवरूनही ऑर्डरची सोय या ॲपवर उपलब्ध आहे. ऑर्डर दिली की दुसऱ्या दिवशी घरपोच फ्री डिलिव्हरी दिली जाते.

पूर्णपणे कोल्हापूर मेड ॲप असून, हळूहळू ही संकल्पना रुजेल, याची खात्री आहे. जसा प्रतिसाद वाढत जाईल, तशी उपलब्ध वस्तूंची यादी आम्ही वाढवणार आहोत.
- दिग्विजय पाटील

Web Title: Grocery Goods on app