सोनईत जनरल स्टोअर्सला आग, लाखोंचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

सोनई येथील मुख्य पेठेत असलेल्या  मनोज जनरल स्टोअर्सला आज सकाळी आग लागली. आगीचे डोंब व धुरांच्या लोड सोनई पासून  तीन-चार  किलोमीटर पासून दिसत होते. सोनई पोलिसांना घटनेची माहिती समजताच सहाययक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेत  अग्निशमन दलाच्या प्रचारन केले.  

नेवासे : तालुक्यातील सोनई येथील मुख्य पेठेतील मनोज जनरल स्टेअर्स या दुकानाला आज गुरुवार (ता.९) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल दीडतासांच्या प्रयत्नांनंतर  आग आटोक्यात आली. या आगीत सुमारे ५०-६० लाखांचे साहित्य जाळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
सोनई येथील मुख्य पेठेत असलेल्या  मनोज जनरल स्टोअर्सला आज सकाळी आग लागली. आगीचे डोंब व धुरांच्या लोड सोनई पासून  तीन-चार  किलोमीटर पासून दिसत होते. सोनई पोलिसांना घटनेची माहिती समजताच सहाययक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेत  अग्निशमन दलाच्या प्रचारन केले.  

हेही वाचा - निघोज अहवाल आले आणि तेही निगेटीव्ह

आग आटोक्यात आणण्यासाठी मुळा, ज्ञानेश्वर साखर कारखाना, शनी शिंगणापूर देवस्थानचे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न केले.  आगीने रौद्ररूप धारण केल्याने सकाळी आठ वाजलेले आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.  

आगीचे नेमके कारण समजले नसलेतरी ही आग शॉकसर्किट मुळे लागल्याचा अंदाज आहे. आगीत सर्व जनरल स्टोअर्स जाळून खाक झाले आहे. वर्दळीच्या व मुख्य पेठेत ही आग लागल्याने परिसरातील राहिवाशांत घबराटीचे वातावरण पसरले होते. विझविण्यासाठी गावातील तरुणांनीही  प्रयत्न केले
दरम्यान घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे हयांनी घटनास्थळी भेट दिली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The grocery store fire at Sonai