कोल्हापूर : बिजली चौकात किराणा दुकान पेटवले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

कोल्हापूर - जवाहर नगरातील बिजली चौक येथे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या भांडणातून अनोळखी व्यक्तींनी काल रात्री किराणा दुकान पेटवले. दारात लावलेल्या चार मोटर सायकलींचीही तोडफोड केली. या घटनेत एक किराणा दुकान जळून खाक झाले असून त्याच्या शेजारच्या घरालाही आगीची झळ बसली. आगीची घटना समजताच अग्निशामक दलाच्या मदतीने ही आग आग आटोक्यात आणली. 

राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. याप्रकरणी सरस्‍वती संतोष कदम (वय 31 रा. बिजली चौक) यांनी फिर्याद दिली आहे.  त्यांच्या फिर्यादीनुसार ओंकार अनिल सटाले, स्वप्निल विजय पोळ, संकेत सुदेश भटकर, अनिकेत अनिल सटाले, शुभम सुदेश हटकर, सुनील अनिल पोळ, गौरव मनोज पोळ, अनिल आप्पा पोळ यांच्यावर राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला  आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा ते सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान दोन्ही गटाकडून राजारामपुरी पोलिसात निवेदन देण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grocery store is set on fire in Bijali Chowk in Kolhapur