कऱ्हाडला संकलीत करवाढीचा शॉक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - पालिका स्वच्छ अभियानातंर्गत युजर्स चार्जेस लागू झाल्यानंतर पालिकेने नागरीकांना सरासरी तीस टक्के संकलीत करवाढीचा शॉक दिला आहे. संकलीत करवाढीच्या नोटीसा मिळकत धारकांना मिळाल्या आहेत. नेहमीच्या संकलीत करापेक्षा सरासरी तीस टक्क्याहून अधिक वाढ झालेल्या नोटीसा मिळाल्याने नागरीकांच्या प्रतिक्रीया संतप्त आहेत. त्याविरोधात हरकती नोंदवण्यासाठी पालिकेत नागरीकांची गर्दी होती. जुन्या मिळकतींना सरासरी दहा ते पंधरा तर नव्या मिळकतींना तीस ते चाळीस टक्क्यांनी करवाढ झाली आहे. 

पालिकेने कर आकारणीचे काम खासगी कंपनीस दिले आहे. त्यानंतर येथे मोठी करवाढ झाली. मात्र त्यानंतर शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पंचवार्षिक कर आकारणीचे नियोजन केले गेले. त्यात पंचवार्षिक कर मुल्याकंनानुसार संबधित कंपनीने येथे पहाणी केली आहे. पहाणीनंतर त्यांनी आकरलेली संकलीत कराची बीलेही वाटली जात आहेत. त्यात सरासरी तीस टक्क्यांनी संकलीत कर वाढवून नोटीसा देण्यात आल्या आहेत. नवीन मिळकतींची करवाढ सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत आहे. जुन्या मिळकतींची करवाढ सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांनी झाली आहे. मातीच्या घरांची कर वाढ सुमारे दहा ते पंधरा टक्के झाली आहे. नेहमी येणाऱ्या कर आकारणीपेक्षा ज्यादाची आलेली बिले बघून नागरीकांच्याही संतप्त प्रतिक्रीया आहेत. त्या विरोधात हरकती नोंदवण्यासाठी पालिकेत नागरीकांनी गर्दी केली होती. त्याबाबत मुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले, कर वाढ आकरणीत वाढ झाली आहे. त्याबाबत मिळकतधारकांना नोटीसाही देण्यात आल्या आहेत. मात्र करवाढ अंतीम करवाढ नाही. त्याबाबत पालिकेत नागरीकांनी हरकती नोदंवण्याचे आवाहन केले आहे. नागरीकांसाठी पालिका आहे, त्यामुळे त्यांना मंजूर नसलेली कर आकारणी होणार नाही. मात्र आलेल्या कर आकारणीवर नागीरकांनी नक्कीच हरकत नोंदवण्याची गरज आहे. तसे त्या बीलातही नमूद केले आहे. 

संकलीत करवाढीच्या नोटीसा मिळाल्यानंतर नागरीकांनी हरकती नोंदवण्यासाठी पालिकेत आज गर्दी केली होती. करवाढीच्या विरोधात त्यांच्या भावना संतप्त होत्या. त्याबाबत लोकशाही आघाडीचे विरोध पक्षनेते सौरभ पाटील यांनी मुख्याधिकारी श्री. डांगे यांच्याशी यांची भेट घेतली. करवाढ अन्यायकारक आहे, ती मागे घ्यावी, अशी त्यांच्याशी चर्चा केली. त्याबाबत श्री. पाटील म्हणाले, पालिकेकडून अन्यायकारक संकलीत कराच्या दरवाढ झाली आहे. त्या मिळकत दरवाढीविरूद्ध लोकशाही आघाडीच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात या दरवाढीच्या विरोधात भुमिका गेण्यात आली आहे. काही ठिकाणी दुप्पट, अडीचपट झाली आहे. यासंदर्भात नागरीकांना घेऊन मूख्याधिकार्यांची भेट घेऊन नागरीकांची भूमिका सांगितली आहे. शासकीय नियमाने फारतर पन्नास टक्के करवाढ करता येते. मात्र सध्याची करवाढ 100 ते 150 टक्के इतकी आहे. असा अन्यायकारक करवाढीविरेदात अपील करण्याचे आवाहन लोकशाही आघाडीने केले आहे. कोणत्याही परीस्थितीमध्ये शहरातील सामान्य नागरीक यामध्ये भरडला जाऊ नये यासाठी आम्ही नागरीकांसमवेत ठामपणे उभे आहोत.

Web Title: Growth Tax Shock to people in karhad