

Guardian Minister Chandrakant Patil inaugurates Samruddha Panchayatraj Abhiyan in Sangli district covering 696 villages.
Sakal
सांगली: ‘‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून आपल्या गावाच्या विकासासाठी सामूहिक चळवळ उभी करावी. यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल. सांगली जिल्हा सर्वच उपक्रमांमध्ये आघाडीवर असतो. या अभियानातही जिल्हा राज्यात अव्वल राहील,’’ असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला.