esakal | सांगलीचे पालकमंत्री निष्क्रीय तर शासन कुचकामी; खोत, पडळकरांची टीका

बोलून बातमी शोधा

सांगलीचे पालकमंत्री निष्क्रीय तर शासन कुचकामी; खोत, पडळकरांची टीका
सांगलीचे पालकमंत्री निष्क्रीय तर शासन कुचकामी; खोत, पडळकरांची टीका
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. करोना उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. पालकमंत्री निष्क्रिय आहेत, तर राज्य शासन कुचकामी ठरले आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज येथे केली. सांगली जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीबाबत आमदार खोत व आमदार पडळकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर आमदार खोत व आमदार पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, पालकमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यात तळ ठोकून बसून येथील परिस्थिती हाताळणं गरजेचं होतं. मात्र विरोधी आमदारांची खिल्ली उडवायची आणि त्यांच्या मागण्या मान्य करायच्या नाहीत. यामुळेच सांगलीतील परिस्थिती गंभीर बनली आहे. एक वर्षापूर्वी विरोधी आमदारांनी त्यांच्याकडे ऑक्सीजन तयार करण्याचा प्लांट उभा करण्याची मागणी केली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष केले. आता ऑक्सिजनचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

हेही वाचा: International Dance Day : नसानसांत भिनलेल्या नृत्यामधून चैतन्यदायी ऊर्जा!

आमदार पडळकर म्हणाले, महात्मा फुले योजनेतून उपचार केले जात असलेल्या रुग्णालयांची संख्या वाढवावी. रेमडेसिव्हिरही मागणी प्रमाणे मिळत नाहीत. गेल्या दोन दिवसात एकही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही. मिरज येथील शासकीय रुग्णालयात आणखी बेड वाढवण्याची आवश्‍यकता आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी भाजपची जिरवायची या उद्देशाने सत्ता मिळवली. मात्र महाविकास आघाडी ही जनतेची जिरवत आहे. राजकारण बाजूला ठेवून करोनाच्या संकटातून सत्ताधाऱ्यांनी जनतेला बाहेर काढावे.