अतिथी शिक्षक मानधनाविनाच 

guest teacher without payment in belgaum
guest teacher without payment in belgaum

चिक्कोडी (जि. बेळगाव) ः सरकारी शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागांवर शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी अतिथी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. पण त्यांच्या निवडीला वर्ष सरत आले तरी मानधन दिलेले नाही. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील प्राथमिक सरकारी शाळेत 1793 व माध्यमिक शाळेत 288 अशा 2081 अतिथी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. पण त्यांना मानधन देण्यासाठी निधीची कमतरता असल्याने मोठा घोळ व अडचण झाली आहे. 

चिक्कोडी जिल्ह्यातील आठ विभागापैकी अथणीत 292, कागवाड 68, रायबाग 310, चिक्कोडी 228, निपाणी 84, हुक्केरी 247, गोकाक 154, मुडलगी 410 अशा एकूण 1793 प्राथमिक शाळा शिक्षकांची नियुक्ती केली आहे. माध्यमिक शिक्षकांच्या अथणीत 45, कागवाड 2, रायबाग 52, चिक्कोडी 29, निपाणी 9, हुक्केरी 45, गोकाक 16, मुडलगी 90 मिळुन 288 शिक्षकांची नियुक्ती आहे. या सर्व शिक्षकांचे 1.84 कोटी रुपयाचे मानधन थकीत आहे. 

शिक्षकांना मानधनही तुटपुंजे 
प्राथमिक अतिथी शिक्षकांना दरमहा 7 हजार 500 रुपये व माध्यमिक शिक्षकांना दरमहा 8 हजार रुपये असे तुटपुंजे मानधन आहे. ते देखील वेळेत मिळत नसल्याने आर्थिक तारांबळ सुरु आहे. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. पण विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या मानधनाला निधी उपलब्ध नाही, ही खेदजनक बाब आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com