पाहुण्यांना रांगेत उभे करून नोटा बदलून घेण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - नोकर-चाकर, पै-पाहुण्यांना रांगेत उभे करून पाचशेच्या बेहिशेबी नोटा बदलून घेण्यास आता सुरवात झाली आहे. चार हजार रुपयांपर्यंत नोटा कोणीही बदलून घेऊ शकतो, हे खरे असले तरीही या रांगेतील खोटेपणाचा बुरखा गडत होऊ लागल्याने रांगेत रोज वाढच होत आहे. विशेषतः अवैध मार्गांनी पैसे मिळविवेल्यांनी आपले कामगार, पै-पाहुण्यांना रांगेत उभे केले आहे. या त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्याकडील सर्व बेहिशेबी पैसा "हिशेबी' होईल की नाही हा पुढचा भाग आहे; पण काही बेहिशेबी रक्कम मात्र हिशेबी होऊ शकणार आहे.

अशाच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता दीपावली झाल्यावर एका व्यावसायिकाने कामगारांना दहा हजार रुपये भेट दिले आहेत आणि नोटा बदलून त्यातील पाच हजार रुपये परत करण्याची अट घातली आहे. हे एक केवळ उदाहरण आहे; पण रांगेत दुसऱ्याला उभे करून आपल्याकडील नोटा बदलून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असाच प्रकार खात्यावर पैसे भरण्याच्या बाबतीत होणार आहे.

एका व्यक्तीने अडीच लाख रुपये आपल्या खात्यावर भरले तर त्याला कोणत्याही चौकशीला सामोरे जावे लागणार नाही. अशा स्वरुपाची चर्चा पसरली गेली आहे. त्यातल्या नेमक्‍या तरतुदी किंवा पैसे भरल्यानंतर त्याची चौकशी कशी होणार किंवा होणार नाही हे नेमके स्पष्ट नाही. तरीही बेहिशेबी रक्कम वेगवेगळ्या परिचित व्यक्तींच्या खात्यावर भरली जाणार हे स्पष्ट आहे. मात्र, आजवर कधी दहा-पंधरा हजार किंवा पगाराच्या रकमेइतकेच व्यवहार ज्यांच्या खात्यावर आहेत त्यांच्या खात्यावर या पळवाटेमुळे पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांची रक्कम दिसणार आहे आणि ही रक्कम पुढे काही दिवसांनी एकदम काढली जाणार आहे. त्यामुळे अशा व्यवहारात मात्र आता लगेचच नव्हे, तर पुढे कधीही चौकशी करता येऊ शकणार नाही.

Web Title: Guests start to change currency by standing in a queue

टॅग्स