हुमणीच्या प्रादुर्भावाबाबत मार्गदर्शन करावे ; पापरीतील शेतकऱ्यांची मागणी

राजकुमार शहा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मोहोळ : पापरी ता. मोहोळ आणि परिसरातील गावात ऊस पिकाला हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतात उभ्या असलेल्या ऊसाचे प्लॉट भुईसपाट होत आहेत. अगोदरच पाऊस नसल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालिका सुरु झाली आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असुन कृषी विभागाने गावोगावी शेतकऱ्यांचे या हुमणीबाबत प्रबोधन करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी लोटला आहे मात्र, अद्याप पावसाने ओढ दिल्याने विहीरी व बोअर यांची पाणी पातळी घटली आहे त्यामुळे ऊसाला पाणी कमी पडत आहे परिणामी  ऊस जोपासणे अवघड झाले आहे पाणी कमी असल्याने जमिनी वापशावर आहेत. त्यामुळे हुमणीला पोषक वातावरण आहे. ऊसाच्या बेटाच्या मुळ्या हुमणी कुरतडत असल्याने बेटे आदांतरी होऊ लागली आहेत. त्यामुळे कारखाना सुरू होईपर्यंत शेतात किती ऊस राहील याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे.

खत दुकानदाराकडे गेल्यास व ही अडचण सांगितली. तर त्याने देईल ते औषध नेऊन टाकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. दिलेल्या औषधाने फरक पडला तर ठिक अन्यथा आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हुमणीसाठी नेमकी काय उपाययोजना करावी, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. चुकीच्या व माहितीअभावी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने हुमणीबाबत प्रबोधन शिबिर आयोजित करावे, अशी मागणी  केली जात आहे.

Web Title: to Guide farmers cause of Humani