शिरवळमध्ये गुंडाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

खंडाळा - पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कालच तडीफार केलेला गुंड प्रतीक विजय चव्हाण (वय 22, मूळ रा. भोळी, ता. खंडाळा व सध्या राहणार शिरवळ) याचा सात जणांनी दगडाने व विटांनी ठेचून खून करण्यात आला.

अविनाश पोपट मोरे (वय 21) व रॉकी हरिदास बाला (वय 23, शिरवळ) हे जखमी झाले आहेत. सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, की प्रतीक चव्हाण, रॉकी बाला व अविनाश मोरे हे तिघे येथील शिवाजी चौकात शेकोटी करून बसले होते. रात्री बाराच्या सुमारास आसिफ शेख, रियाझ ऊर्फ मिन्या इक्‍बाल शेख, मुन्ना शेख, बबलू खान, अण्णा खान, रफीक खान, सद्दाम खान (सर्व रा. शिरवळ) या सात जणांनी प्रतीकचा खून केला. विशाल जाधव हा आसिफ शेख याच्याकडे कामाला असल्यामुळे आसिफ शेख व त्याचा मित्र रियाज शेख हे त्यांच्यावर चिडून होते. प्रतीकवरही चिडून होते. आसिफ शेखने प्रतीकच्या डोक्‍यात दगड मारला व रियाज शेख याने अविनाश मोरे व रॉकी बाला यांना विटाने मारहाण केली. भांडणे सुरू असताना बाकीचे पाच जण आले. सगळ्यांनी मिळून मारहाण केली. त्यात प्रतीक जागीच ठार झाला. अविनाश मोरे व रॉकी बाला यांना दुखापत झाली.

पोलिसांनी सांगितले, की जून महिन्यात प्रतीक चव्हाण व अविनाश मोरे यांनी विशाल जाधव यास मारहाण केली होती. या पूर्ववैमनस्यातून हा खून झाला आहे. पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे तपास करीत आहे.

सोमवारीच झाली होती हद्दपारी
प्रतीक चव्हाण व अविनाश मोरे, रॉकी बाला यांच्यावर शिरवळ पोलिस ठाण्याअंतर्गत गर्दी, मारामारी, दुखापत व खुनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे आहेत. त्यांच्या हद्दपारीची मागणी नागरिकांतून होत होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये सातारा व पुणे जिल्ह्यांतून सहा महिने कालावधीसाठी तिघांच्या हद्दपारीचा आदेश सोमवारी दिला होता. भर चौकात खून झाल्याने शिरवळमध्ये तणावाचे वातावरण होते. बाजारपेठही बंद होती.

Web Title: gund murder in shirwal