गुरुजींचा शतकमहोत्सवातही गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सभेत गोंधळाची परंपरा शिक्षकांनी कायम ठेवली. बॅंकेच्या शतकमहोत्सवी वर्षातील सभा तरी विनागोंधळ पार पडेल, अशी अपेक्षा सभासदांना होती; मात्र ती फोल ठरली.

नगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सभेत गोंधळाची परंपरा शिक्षकांनी कायम ठेवली. बॅंकेच्या शतकमहोत्सवी वर्षातील सभा तरी विनागोंधळ पार पडेल, अशी अपेक्षा सभासदांना होती; मात्र ती फोल ठरली.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची शतकमहोत्सवी सभा अध्यक्ष साहेबराव अनाप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शतकमहोत्सवी सभा असल्यामुळे सत्ताधारी व विरोधक सर्व प्रकरणे शांततेत घेऊन, सर्व विषयांवर चर्चा करून निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापानाला आमंत्रित केले होते.

विरोधकांनी त्याला हजेरी लावून काही सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे सभा शांततेत पार पडेल, असा अंदाज बांधला जात होता. सत्ताधाऱ्यांचे त्यासाठी प्रयत्नही सुरू होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ठेवलेल्या पोटनियमांतील दुरुस्त्यांना विरोधकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. ठेवींचा मुद्दा कळीचा ठरला. पोलिसांनी हस्तक्षेप केला; मात्र तो असफल ठरला.

रोहकले गटाच्या संचालकांनी निषेध केला. विकास मंडळाला दहा हजार रुपये देण्याचा ठराव नामंजूर केल्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली. शिक्षक नेते संजय कळमकर यांनी, हा ठराव नामंजूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर तो नामंजूर करण्यात आला.

सभेत गोंधळ होईल, ही जाणीव संचालक मंडळाला झाल्याने त्यांनी अगोदरच पोलिस बंदोबस्त घेतला होता. पोलिस सभासदांना शांत बसविण्याचे प्रयत्न करीत होते. संजय धामणे यांनी, पोलिस कशाला बोलावले, हाच मुद्दा गोंधळाअगोदर उपस्थित केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Guruji's conflict tradition continue