गुरुकुल'ने शिक्षकांची प्रतिष्ठा वाढविली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

""शिक्षक बॅंकेने शताब्दी साजरी करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी काढला. त्यावर सर्व सभासदांचा हक्क आहे. त्याचा विनियोग करण्यासाठी सर्व मंडळांना विश्वासात घ्यायला पाहिजे. तसे होताना दिसत नाही. "एकला चलो रे' फार दिवस चालत नाही.'' 

नगर : गुरुकुल शिक्षक मंडळ शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच समाजात शिक्षकांची प्रतिष्ठा वाढेल असे काम करीत आहे, असे प्रतिपादन शिक्षक नेते संजय कळमकर यांनी केले. 

जामखेड तालुका शिक्षक समिती व गुरुकुल मंडळाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सीताराम सावंत होते. 

राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी, नितीन काकडे, संजय धामणे, सुदर्शन शिंदे, वृषाली कडलग, लक्ष्मण टिमकारे, विजय काकडे, रामदास भापकर, शिवाजी रायकर, भास्कर नरसाळे, संजय नळे, मधू मैड, राजू मरभळ, अशोक मोरे उपस्थित होते. 

औटी म्हणाले, ""शिक्षक बॅंकेने शताब्दी साजरी करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी काढला. त्यावर सर्व सभासदांचा हक्क आहे. त्याचा विनियोग करण्यासाठी सर्व मंडळांना विश्वासात घ्यायला पाहिजे. तसे होताना दिसत नाही. "एकला चलो रे' फार दिवस चालत नाही.'' 
या वेळी अन्य मंडळांच्या शिक्षकांनी "गुरुकुल'ची कार्यपद्धती आवडल्याचे सांगून मंडळात प्रवेश केला. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. पुढील तीन वर्षांसाठी समिती व मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली. मेळाव्यासाठी संतोष डमाळे, अनिल अष्टेकर, राम ढवळे, प्रताप पवार, बळिराम सरोदे, अविनाश पवार, विजय जेधे, सचिन अंदुरे यांनी परिश्रम घेतले. 

"तो' शिक्षक खरा आदर्श 
कळमकर म्हणाले, ""समाज नाही तर शिक्षकच शिक्षकांना अडचणीत आणतो. ज्या शाळेतील शिक्षक एकोप्याने राहतात, त्यांना गावाचा कधीही त्रास होत नाही. अध्यापनाबरोबर शिक्षकांनी समाजाशीही सौहार्दाचे संबंध ठेवले पाहिजेत. ग्रामीण भागातील मुलांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गाव ज्या शिक्षकाचा सन्मान करतो, तो शिक्षक खरा आदर्श असतो.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gurukul increased the reputation of teachers