अक्कलकोट- श्री गुरू मंदिरात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

राजशेखर चौधरी
शुक्रवार, 29 जून 2018

अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री गुरू मंदिरात गुरू पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि धार्मिक परंपरेने साजरा करण्यात आला. यानिमित्त भाविकांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. या सोहळ्याची गेली आठ दिवस सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

या सोहळ्याला शिवपुरी येथील विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले, डॉ.गिरीजा राजीमवाले, मालादेवी राजीमवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. गुरूपौर्णिमेदिवशी पहाटे पाच वाजता श्रींना मंगलस्नान,
महालघुरुद्रभिषेक त्यानंतर दरवर्षी प्रमाणे शहरातून गुरू पिठावरच्या चरण पादुकांची पालखी मिरवणूक मुख्य मार्गावरून काढण्यात आली.

परिक्रमेनंतर डॉ.राजीमवाले यांच्या हस्ते गुरुपूजन करण्यात आले. आठ दिवस हा सोहळा चालला होता.यात संतोष सावंत व त्यांच्या टीमने सुरेल 
भक्ती संगीताचा कार्यक्रम केला.त्यानंतर रोज रात्री नारायण श्रीपाद काणेबुवा 
यांचे भजन ,भारुड,किर्तन आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी नंदकुमार जोशी, सोलापूर यांच्या सुश्राव्य भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा दि. 21 ते 27 जून दरम्यान पार पडला. यावेळी मठाच्यावतीने भाविकांना दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी भूपतभाई वोरा,विद्याधर पारखे, आण्णासाहेब वाले, धनंजय वाळुंजकर, डॉ.गणेश थिटे, वक्रतुंड औरंगाबादकर, पवन कुलकर्णी, बालप्रसाद बियाणी, गुरुप्रसाद रांगणेकर,
इरेश फसगे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: gurupournima celebrated in guru mandir akkalkot