आशीर्वादासाठी देशविदेशातून गोगटे सरांशी संपर्क

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

आज गुरू पौर्णिमेदिवशी आशीर्वाद घेण्यासाठी पहिला दूरध्वनी राज्याचे सचिव विकास खारगे यांचा आला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवलेले आणि जगातील नामवंत गणित तज्ञात ज्यांचा उल्लेख होतो, अशा डॉ. सुभाष खोत यांच्यासह विविध देशांतून विनय भागवत, ललित छाजेड, सागर निगवेकर अशांनी श्री. गोगटे सरांशी संपर्क साधून गुरुपौर्णिमेचा आशीर्वाद घेतला.

इचलकरंजी - त्या गुरुंचा आशीर्वाद घेऊन आज अनेकांनी देश-विदेशात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकीक मिळवला आहे. असे शहरातील वंदनीय गुरुवर्य म्हणून ओळखले जाणारे वा. ग. गोगटे सर यांच्या जीवनातील प्रत्येक गुरुपौर्णिमा एक वेगळ्या स्मृतीच ठरून जाते. सकाळी सहा वाजल्यापासूनच सरांना महाराष्ट्राचे वन खात्याचे सचिव विकास खारगे यांच्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर गणित संशोधनात उल्लेखनीय कार्य करणारे सुभाष खोत यांचे दूरध्वनी आशीर्वाद घेण्यासाठी येतात. 

वयाची ८४ वर्षे पार केलेल्या या गुरुवर्यांबद्दल आजही इचलकरंजी आणि परिसरातील अनेकांना एक वेगळी आस्था आणि आपुलकी आहे. जीवनातील गुरुंबद्दलचे महत्त्व कोणत्याही पदावर गेल्यानंतर किती अधोरेखित असते, याचे उदाहरण म्हणजे गोगटे सर होय. गोगटे सरांनी शहरातील नामांकित असलेल्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिक्षण दानाचे काम केले. निवृत्तीनंतरही त्यांनी अखंडपणे विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला.

गावभागातील एका वाड्यामध्ये असलेल्या या सरांचे घर म्हणजे अनेकांना नालंदा विद्यापीठच ठरले. याच सरांच्या घरातील एका खोलीमध्ये अभ्यास करून आज अनेकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवला आहे. हे सर्वजण आजही इचलकरंजीला आले की गोगटे सरांचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत.

आज गुरू पौर्णिमेदिवशी आशीर्वाद घेण्यासाठी पहिला दूरध्वनी राज्याचे सचिव विकास खारगे यांचा आला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवलेले आणि जगातील नामवंत गणित तज्ञात ज्यांचा उल्लेख होतो, अशा डॉ. सुभाष खोत यांच्यासह विविध देशांतून विनय भागवत, ललित छाजेड, सागर निगवेकर अशांनी श्री. गोगटे सरांशी संपर्क साधून गुरुपौर्णिमेचा आशीर्वाद घेतला. आजही गुरुंबद्दल असलेल्या आस्थेपोटी अनेकजण संपर्कात राहतात. श्री. गोगटे सर हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gurupournima V G Gogate special story