नृसिंहवाडीत साकारणार ‘गुरुसृष्टी’

नृसिंहवाडीत साकारणार ‘गुरुसृष्टी’

नृसिंहवाडी - येथे मळीवाट मार्गावर शुक्‍लतीर्थ परिसरामध्ये गुरुचरित्रातील बावन्न अध्यायावर आधारित गुरुसृष्टी उभारली जाणार आहे. दत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने लवकरच ही अभिनव संकल्पना साकारली जाणार आहे. येथे परिसरात हवा शुद्ध राहण्यासाठी व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी आश्‍लेषा, मघासह २७ नक्षत्रांची बाग फुलणार आहे.

जे. जे. स्कूल मुंबईतील तज्ज्ञ व मार्गदर्शक यांनी शनिवारी पाहणी करून नियोजन आराखडा तयार करण्यास प्रारंभ केला आहे. एकूणच पर्यटन वाढून भाविकांच्या गुरुचरित्रातील प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहावा हा प्रकल्प मागील त्यांचा प्रमुख हेतू आहे.

कन्यागत महापर्वकाळाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्‍लतीर्थामुळे  नृसिंहवाडीसह परिसराला एकशे बावीस कोटी रुपये मंजूर झाले. त्या दत्त देवस्थान ट्रस्टअंतर्गत असणाऱ्या  पाच एकर परिसराचा कायापालट करण्यासाठी दत्त देवस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण पुजारी, सचिव अमोल विभूते, पुजारी परिश्रम घेत आहेत. एकूण जागेपैकी दोन ते तीन एकर शुक्‍लतीर्थ जागेत प्रथमतः काही पर्णकुटी यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. 

नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी सांगितलेल्या गुरुचरित्रातील बावन्न अध्यायावर आधारित पर्णकुटीचा वापर करीत बावन्न मूर्ती त्यामध्ये कणेरीमठ व डेरवणच्या धर्तीवर अनेक मूर्ती प्रसंगानुरूप बसवण्यात येणार आहेत. त्याच्या पार्श्‍वभूमीवर चित्रफिती तयार करून  ‘गुरुसृष्टी’ साकारली जाणार आहेत.

सत्तावीस नक्षत्र बागेची जिल्ह्यातील पहिली संकल्पना येथे साकारण्यात येणार आहे. तारा व दगडी कंपाऊंड सभोवतालाचा परिसर सुरक्षेसाठी बसवण्यात येणार आहे. या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी बाकडे, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, निवास व्यवस्था केली जाणार आहे. एकूणच भाविकांच्या सेवेसाठी दत्त देवस्थान ट्रस्ट कटिबद्ध  राहणार असल्याचे अध्यक्ष पुजारी व सचिव विभूते यांनी सांगितले.

गुरुसृष्टी व २७ नक्षत्रांची बाग फुलवण्याची दत्त देवस्थान ट्रस्टची अभिनव संकल्पना आहे. मुंबईचे दत्त भक्त अभय आचार्य यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन घेऊन हा प्रायोगिक तत्त्वावरील अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे. 
- रामकृष्ण पुजारी,
अध्यक्ष, दत्त देवस्थान ट्रस्ट, नृसिंहवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com