esakal | कर्नाटकहून साताराकडे जाणारा पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकहून साताराकडे जाणारा पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त 
  • रांजणी फाटा येथे कर्नाटकातून साताऱ्याकडे जाणारा सुमारे 2 लाख 84 हजारांचा गुटखा जप्त. 
  • सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांची कारवाई. 
  • प्रेमजीत सुनील ऐवळे (वय 29) व ललित मेडकिया (दोघेही कोरेगाव) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे. 
  • गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक पकडण्याची तालुक्‍यातील पहिलीच कारवाई. 

कर्नाटकहून साताराकडे जाणारा पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कवठेमहांकाळ - रांजणी फाटा येथे कर्नाटकातून साताऱ्याकडे जाणारा सुमारे 2 लाख 84 हजारांचा गुटखा व चारचाकी पोलिसांनी काल सायंकाळी पाचच्या सुमारास पकडली. प्रेमजीत सुनील ऐवळे (वय 29) व ललित मेडकिया (दोघेही कोरेगाव) यांना ताब्यात घेतले आहे. गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक पकडण्याची ही तालुक्‍यातील पहिलीच कारवाई आहे. 

पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांना कर्नाटकातून बेकायदा गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाताच पोलिस उपनिरीक्षक नीलेश चावडीकर यांच्यासह पोलिसांचे पथक तयार केले. गुटखा पकडण्यासाठी कर्नाटकच्या सीमेवर तैनात केले. 
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चारचाकी (एमएच 04 जे 5479) मधून गुटख्याची तस्करी सुरू होती. पोलिसांनी गाडी थांबवत पाहणी केली. गाडीच्या मागील व सीटवर गुटखा आढळून आला. जप्त गुटखा, चारचाकी असा पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी गुटखा, गाडी जप्त करून एकास ताब्यातही घेतले. पोलिस उपनिरीक्षक नीलेश चावडीकर यांच्या पथकातील दीपक गायकवाड, गजानन बिराजदार, हवालदार पडळकर, चंद्रसिंह साबळे, आमिर फकीर यांनी कारवाई केली.  

 
 

loading image
go to top