फेसबुक हॅक करण्याकरिता हॅकर्सचे नवीन तंत्रज्ञान

परशुराम कोकणे
गुरुवार, 19 जुलै 2018

धिस व्हिडिओ इज युवर... अशा ओळी आणि तुमच्या नावाचा उल्लेख असलेले मेसेज गेल्या काही दिवसांपासून फेसबुक मेसेंजरमधून येत आहेत. हॅकर्सनी आपली माहिती चोरण्याच्या उद्देशाने केलेली ही नवीन युक्ती असून फेसबुक वापरणाऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

सोलापूर : धिस व्हिडिओ इज युवर... अशा ओळी आणि तुमच्या नावाचा उल्लेख असलेले मेसेज गेल्या काही दिवसांपासून फेसबुक मेसेंजरमधून येत आहेत. हॅकर्सनी आपली माहिती चोरण्याच्या उद्देशाने केलेली ही नवीन युक्ती असून फेसबुक वापरणाऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

फेसबूक अकाऊंट हॅक करण्याकरिता हॅकर्सनी नवीन तंत्रज्ञान वापरण्यात सुरवात केली आहे. आपल्या फेसबूक मॅसेंजरवर तुम्हाला तुमच्याच एखाद्या मित्राने व्हीडीओ लिंक पाठविलेली दिसेल. त्या लिंकमध्ये धिस इज युवर व्हिडिओ... आणि तुमचे नाव असेल. उत्सुकतेपोटी तुम्ही त्या लिंकवर क्‍लिक केला तर डेल कास्टीलो लोरा असे इंग्रजीत लिहिलेले दिसेल. व्हिडिओ दिसणार नाही परंतु तुमचा युजर नेम व पासवर्ड हॅकर्सपर्यंत पोचून जाईल. अशा कोणत्याही लिंकवर क्‍लिक करू नये. आपल्याकडून चुकीने असे काही झाले असल्यास तत्काळ आपला फेसबूक आणि ईमेल आयडीचा पासवर्ड बदलावा व आपले अकाऊंट सेक्‍यूअर करावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. सायबर क्राईम संदर्भातील तक्रार किंवा अधिक माहिती 0217-2744616 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

हकर्स मंडळींनी नव्या पद्धतीने आपली माहिती चोरण्यास सुरवात केली आहे. आपली माहिती चोरून फसवणूक करण्याच्या उद्देशाने आपल्या मित्राच्या नावाने फेसबुक मेसेंजरमध्ये मेसेज पाठविला जात आहे. लिंक ओपन केल्यावर आपली माहिती चोरली जाते. फेसबुक वापरणाऱ्यांनी अशाप्रकारची कोणतीही लिंक ओपन करू नये. आपली फसवणूक झाली असेल तर तत्काळ पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा असे यावेळी सायबर पोलिस ठाण्याच्या प्रमुख मधुरा भास्कर यांनी सांगितले आहे.

Web Title: Hackers get a new technology to hack Facebook