पंढरपूर तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

पंढरपूर - पंढरपूर तालुक्‍यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे द्राक्षासह ज्वारी, गहू, मका, हरभरा या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. 

मागील आठवड्यात हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला होता. दोन दिवसांपासून वातावरणातील उकाडा वाढला होता. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी सरकोली, ओझेवाडी, पुळूज, शंकरगाव, पुळूजवाडी, नळी या भागाला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. 

सरकोली येथे वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. तर पुळूज, आंबेचिंचोली या भागात द्राक्ष पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मक्‍यासह चारा पिके देखील आडवी झाली आहेत. यामध्ये आंबा फळांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे कासेगाव, अनवली, खर्डी या परिसरातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. पुढील काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याने तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. 

पिकांची नुकसान भरपाई द्यावी 
आज झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या दुष्काळामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशातच आजच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी केली आहे. 

Web Title: Hail, rain Pandharpur Taluka

फोटो गॅलरी