सांगली बाजार समितीत हमालांचे काम बंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सांगली - कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी आज काम बंद आंदोलन केले. समितीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. अचानक आंदोलनामुळे समितीतील कामकाज ठप्प झाले. हळद, गुळासह अन्य सर्व सौदे बंद राहीले. 

सांगली - कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी आज काम बंद आंदोलन केले. समितीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. अचानक आंदोलनामुळे समितीतील कामकाज ठप्प झाले. हळद, गुळासह अन्य सर्व सौदे बंद राहीले. 

समितीतील अनेक बोळरस्ते बेकायदेशीररित्या विकण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामेही केली आहेत. हमालांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून हमाल संघटनेत याविषयी असंतोष होता, आज अचानक त्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले.

कोल्हापूरसह काही जिल्ह्यातून तसेच कर्नाटकातील शेतमाल घेऊन आलेली वाहने माल न उतरवल्याने खोळंबून राहिली. व्यापाऱ्यांना सौदे करता आले नाहीत. हमालांनी समिती कार्यालयासमोर निदर्शने व घोषणाबाजी केली. सुमारे बाराशे हमाल बंदमध्ये सहभागी झाले. या आंदोलनामुळे कोट्यवधींची उलाढाल थंडावली.

Web Title: Hamals agitation in Sangli market committee