हामदाबाज कॅनॉलवरील पूल वाहतुकीस धोकादायक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

हामदाबाज येथील कण्हेर उजव्या कॅनॉलची झालेली दयनीय अवस्था.
 

कोंडवे ः हामदाबाज (ता. सातारा) येथून कण्हेरचा उजवा कालवा वाहतो. या कालव्यावरील पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. किडगाव-धावडशीकडे जाणारा रस्ता सोयीचा रस्ता म्हणून पाहिले जाते. 
किडगाव येथील महाविद्यालयाकडे जाणारे विद्यार्थीही याच रस्त्याने जातात. परंतु, याच उजव्या कॅनॉलवरील पुलाला मोठमोठे तडे गेले आहेत. हिरापूरला काही दिवसांपूर्वी असाच पूल पडला होता. त्यासारखी स्थिती झाल्यास किडगाव, धावडशीकडे जाणारी वाहतूक पुन्हा एकदा वर्येमार्गे करावी लागेल. हा पूल वाढत्या रहदारीमुळे धोकादायक झाला आहे. या पुलाच्या खालील बाजूस बरेचसे दगड निसटले आहेत. तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासन व पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष घालून त्वरित या पुलाची दुरुस्ती करावी. कारण हा पूलच नव्हे, तर या पुलामुळे कालवा फुटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गावचा रस्ता व दलित वस्तीत पाणी शिरून घरांचे नुकसान होऊ शकते. संबंधितांनी वेळीच लक्ष घालावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hamdabazz bridge becames dangerous for traffic