जिल्हा क्रीडा संकुलातील दीड हजार चौरसफूट बांधकामावर हतोडा 

अमित आवारी
रविवार, 8 डिसेंबर 2019

नगर : नगर शहरातील माळीवाडा परिसरात बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर जिल्हा क्रीडा संकुलात बांधण्यात आले आहे. या क्रीडा संकुलात ठेकेदारानेच विनापरवान अतिरिक्‍त दीड लाख चौरस फूट बांधकाम केले आहे. हे अतिक्रमण पाडण्याचे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिलेले असल्याने महापालिकेने आज सकाळी आठ वाजेपासून ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला ठेकेदार जवाहर मुथा यांनी विरोध करत माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे असे सांगितले मात्र महापालिकेने जोपर्यंत स्टे ऑर्डर दाखवत नाहीत तोपर्यंत कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

नगर : नगर शहरातील माळीवाडा परिसरात बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर जिल्हा क्रीडा संकुलात बांधण्यात आले आहे. या क्रीडा संकुलात ठेकेदारानेच विनापरवान अतिरिक्‍त दीड लाख चौरस फूट बांधकाम केले आहे. हे अतिक्रमण पाडण्याचे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिलेले असल्याने महापालिकेने आज सकाळी आठ वाजेपासून ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला ठेकेदार जवाहर मुथा यांनी विरोध करत माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे असे सांगितले मात्र महापालिकेने जोपर्यंत स्टे ऑर्डर दाखवत नाहीत तोपर्यंत कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

Hammer on the construction of one and a half thousand square feet of district sports complex

महापालिकेने आज सकाळीच जिल्हा क्रीडा संकुलातील विनापरवाना अतिरिक्‍त बांधकाम पाडण्यास सुरवात केली. 

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकातील कर्मचारी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास नव्या महापालिका इमारती जवळ जमा झाले. नगर रचना विभागातील उपअभियंता तथा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेच्या झेंडीगेट प्रभाग समितीचे अधिकारी अशोक साबळे, 40 कर्मचारी, दोन जेसीबी, एक डंम्पर असे पथक सकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकुलात दाखल झाले. 

हेही वाचा - तांत्रिक चुकीमुळे...!

जिल्हा क्रीडा संकुलात "ए' इमारत, एमआर ट्रेड सेंटर ("बी' इमारत) पार्किंगच्या जागेत बांधण्यात आलेल्या आहेत. तर संकुलातील तळघरात सुमारे 48 गाळे विनापरवाना अतिरिक्‍त बांधण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दीड वर्षांपूर्वी महापालिकेच्या प्रभारी आयुक्‍तपदभार होता. त्यावेळी द्विवेदी यांनी जिल्हा क्रीडा संकुलाला भेट दिली होती. या भेटीत जिल्हा क्रीडा संकुलातील विनापरवाना अतिरिक्‍त बांधकामाचा विषयही निघाला होता. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्याशी चर्चाही केली होती.

महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग सेवानिवृत्त झाल्यामुळे आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे महापालिकेचे प्रभारी आयुक्‍तपद आले आहे. हा पदभार मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील विनापरवाना अतिरिक्‍त बांधकाम काढण्यासंदर्भात बैठका घेतल्या. महापालिकेच्या स्थायी समितीनेही हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ठराव संमत केला होता. त्यानुसार आज ही कारवाई सुरू झाली आहे. 

अवश्‍य वाचा - "माणसा असे गीत गावे तुझे हित व्हावे' 

आज सकाळपासूनच एमआर ट्रेड सेंटर ("बी' इमारत) पाडण्यास सुरवात झाल्याचे समजताच ठेकेदार जवाहर मुथा जिल्हा क्रीडा संकुलात दाखल झाले. त्यांनी सुरेश इथापे यांना माझ्याकडे न्यायालयाचे स्टे ऑर्डर आहेत. त्यामुळे कारवाई थांबवा असे सांगितले. यावेळी जिल्हा क्रीडा संकुलाचे वास्तुविशारद अशोक काळे यांनीही इथापे यांना कारवाई थांबविण्याची विनंती केली. मात्र ऑर्डर दाखविल्याशिवाय कारवाई थांबविली जाणार नाही असे इथापे यांनी स्पष्ट केले. 

काय आहे प्रकरण 
2001 साली तत्कालीन नगरपालिकेने ठराव करून वाडिया पार्कची जागा जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यासाठी क्रीडा संकुल समितीकडे वर्ग केली. यात 57 हजार 500 चौरस फूट बांधकाम करण्याची परवानगी नगरपालिकेच्या नगररचना विभागाने दिली होती. यात 152 गाळांना मंजुरी देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात सुमारे दीड लाख स्केअर फूट बांधकाम करण्यात आले. यात दोन इमारती पार्किंग जागेत तयार करण्यात आल्या तर संकुलात तळघर तयार करून सुमारे 48 गाळे अतिरिक्‍त तयार करण्यात आले.

2004 साली बांधकाम पूर्ण झाले. अतिरिक्‍त बांधकाम झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने संबंधितांना नोटिसा दिल्या. 2005 साली उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर 2013 साली निकाल लागला. न्यायालयाने महापालिकेला हे अतिक्रमण पाडण्याचे आदेश दिले. या संदर्भात जवाहर मुथा यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्‍तांकडे अर्ज केला होता. विभागीय आयुक्‍तांनी चौकशी करून हे अनधिकृत अतिरिक्‍त बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hammer on the construction of one and a half thousand square feet of district sports complex