पाण्यासाठी हंडा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

सातारा - दिव्यनगरी (कोंडवे, ता. सातारा) येथील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील नळ पाणीपुरवठा योजनेतून गैरव्यवहार झाला असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच पाणीपुरवठा तत्काळ चालू करावा, या मागणसाठी भाजपच्‍या माध्यमातून दिव्यनगरीतील ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला. 

पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून दुपारी बाराच्या सुमारास हंडा मोर्चास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे जिल्हा परिषदेवर मोर्चा गेला. भाजपचे शहराध्यक्ष सुनील काळेकर, सरचिटणीस विकास गोसावी, चिटणीस नीलेश कदम, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप मेळाट यांच्यासह दिव्यनगरीतील लहान मुलांसह महिला, ग्रामस्थ मोर्चात सहभागी होते.  प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की दिव्यनगरीसाठी एक कोटी ५९ लाख ५० हजारांची नळ पाणीपुरवठा योजना मंजुरी केली. त्याचे काम भोईटे कन्ट्रक्‍शनला दिले असून, शासनाच्या मुदतीपेक्षाही जास्त काळ काम सुरू अहे. कामाचा दर्जा निकृष्ट असून, संबंधित ठेकेदाराने निविदेप्रमाणे काम केलेले दिसत नाही. लोकवर्गणीसाठी प्रत्येक कुटुंबाकडून पाच हजार ३०० रुपये दिले असतानही मीटर बसविण्याच्या नावाखाली अडीच हजार, तर कधी पाणीपट्टीच्या नावाखाली मनमानी पैसे उकळले जात आहेत. या योजनेतील गैरव्यवहाराची भाजपने तक्रार केल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यात खोट्या पावत्या आढळल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते; परंतु आजअखेर तसा गुन्हा दाखल झालेला नाही. योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत केला जावा.

Web Title: Handa Morcha in satara