बसस्थानकासमोरच्या रस्त्यावरील हातगाड्या, खोकी जप्त

बलराज पवार 
Saturday, 3 October 2020

सांगली : शहरात आज तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

सांगली : शहरात आज तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. रस्त्यावरील हातगाड्या, खोकी जप्त करण्यात आली. महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी तीन दिवसांत बाजारपेठ, मारुती रोड रस्त्यांवरील शेड, हातगाड्या, बोर्ड काढून रस्ते मोकळे केले. 

महापालिकेच्या उपायुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर राहुल रोकडे यांनी शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली. उपायुक्त रोकडे यांनी पहिल्या दिवशी बालाजी चौक ते मारुती चौक, दुसऱ्या दिवशी रिसाला रोड आणि आज मध्यवर्ती बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरील दुकानांबाहेर असणारे शेड, गाड्या, खोकी ही अतिक्रमणे काढून साहित्य जप्त केले.

आज 20 हून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली. या मोहिमेत उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि अतिक्रमण विभागाचे विक्रम घाटगे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handcarts, boxes confiscated on the bus stand