सांगलीत दिव्यांग जोडप्याचा विवाह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

सांगली - जागतिक दिव्याग दिनानिमित्त सांगलीत दिव्याग जोडप्याचा  विवाहसोहळा पार पडला. दिलीप पवार आणि शारदा भोसले असे या जोडप्याचे नाव असून दोघेही पायाने अपंग आहेत. 

सांगली - जागतिक दिव्याग दिनानिमित्त सांगलीत दिव्याग जोडप्याचा  विवाहसोहळा पार पडला. दिलीप पवार आणि शारदा भोसले असे या जोडप्याचे नाव असून दोघेही पायाने अपंग आहेत. 

रजिस्टेशन पद्धतीने सांगलीत दिव्याग जोडप्याचा हा विवाह सोहळा पार पडला. सांगली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी विजय कुमार काळम, सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, समाजकल्याण विभागाचे सभापती ब्रह्मानंद पडळकर उपस्थित होते. दिव्याग दिनादिवशी हे दिव्यांग जोडपे विवाहबद्ध झाल्याने वधू आणि वर या दोन्हीकडील नातेवाईकाचे डोळे पाणावले. याशिवाय वैवाहिक जीवनाचे स्वप्न पूर्ण झाल्याने वधू-वराचाचेहऱ्यावर देखील हास्य फुलले होते.

दिलीप तुकाराम पवार या दिव्यांग तरुणाचा शारदा महादेव भोसले या दिव्यांग तरुणीशी विवाह पार पडला. दिलीप  पवार आणि शारदा भोसले हे जोडपे पायाने अपंग आहे. मूळचे जत तालुक्यातील असलेले दिलीप यांचे बी ए पर्यत शिक्षण झाले असून  ते झेरॉक्स सेंटर आणि टायपिंग सेंटरचा व्यवसाय करतात. तर शारदा भोसले या मूळच्या सांगलीच्या आहेत.

 

Web Title: handicap pair marriage in Sangli