अपंगत्वावर मात करत साक्षी देतेय परीक्षा

पाचगणी - अपंग साक्षी घोणे दहावीची परीक्षा देताना.
पाचगणी - अपंग साक्षी घोणे दहावीची परीक्षा देताना.

भिलार - जन्मतः शारीरिक अपंगत्व लाभल्यामुळे आई-वडिलांचा आधार, जिद्द आणि बुद्धीच्या मनोधैर्यावर सहायक लेखनिक मदतीला घेऊन येथील हिलरेंज हायस्कूलची विद्यार्थिनी साक्षी संतोष घोणे हिने दहावीच्या परीक्षेपर्यंत मजल मारली आहे.  

साक्षी जन्मतः ८० टक्के अपंग, विकलांग आहे. ती हात व पाय या दोन्हीचे व्यंग घेऊन जीवन जगत आहे. अचाट बुद्धीचातुर्य आणि काही तरी करण्याची जिद्द या जोरावर ती शाळेत जाऊ लागली. अभ्यासात हुशार असल्याने तिचे आई आणि वडीलही तिच्यावर खूप मेहनत घेत आहेत. केवळ कान, डोळे आणि बुद्धीच्या जोरावर ती शिक्षण घेत आहे. अगदी तिला रोज उचलून शाळेत घेऊन जावे लागते. 

पायाचे अपंगत्व असल्यामुळे तिला चालता येत नाही. आई वैशाली घोणे या पाचगणी नगरपालिका शाळेत शिक्षिका आहेत. त्यामुळे तिच्या शुश्रूशेबरोबरच तिची दैनंदिन सेवा आणि अभ्यासाची जबाबदारीही त्यांनी चोख बजावली आहे. 

साक्षी लहानपणापासून हुशार आहे. अगदी नववीपर्यंत ती ८० टक्केपर्यंत गुण मिळवत आहे. इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा साक्षीने पाचगणीतील महात्मा फुले विद्यामंदिर या केंद्रावर लेखनिकाच्या साह्याने दिली आहे. साक्षीचे अपंगत्व पाहून राज्य परीक्षा मंडळाने तिला परीक्षेच्या मदतीसाठी नववीच्या वर्गात शिकत असलेला लेखनिक मंजूर केला. आई-वडिलांच्या सहकार्याबरोबर शाळेतील सर्वांच्या सहकार्यामुळे तिने दहावीची परीक्षा दिली.

‘हिलरेंज’चे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे, प्राचार्या तेजस्विनी भिलारे, मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे आदींनी साक्षीला सहकार्य केले. साक्षीने ‘सकाळ चित्रकला स्पर्धेत’ भाग घेऊन स्वतः सुंदर चित्र रेखाटत तिने प्रथम क्रमांकही पटकावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com