हनुमानमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास 'श्री'च्या मिरवणूकीने प्रारंभ

सुनील गर्जे 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नेवासे : श्रवण महिन्याचे औचित्य साधून अनेक कुकाणे (ता. नेवासे) येथील नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलश स्थापना व महायज्ञा निमित्त तीन दिवस चालणार्‍या उत्सव सोहळ्याचा पवणपुत्र हनुमान की जय.. प्रभू रामचंद्र की जय च्या जयघोषात 'श्री'च्या सवाद्य मिरवणुकीने रविवार (ता. 12) रोजी प्रारंभ झाला. यावेळी फटाक्याच्या आतषबाजी व मिरवणुकीच्या आग्रभागी असलेल्या नगरी ढोल, ताशे व झांज पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

गेल्या सात-आठ वर्षांपासून प्राणप्रतिष्ठा प्रतीक्षेत असलेल्या कुकाणे येथील हनुमान मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला रविवारी प्रारंभ झाला. शहरातून दुपारी हनुमानमूर्तिची फुलांनी सजवलेल्या वाहनातून शहरातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या आग्रभागी नगरी ढोल, तासे व झांज असलेले पथक, फुलांनी सजवलेले कलश डोक्यावर असलेल्या विद्यालयीन मुली, भजनी मंडळ उपस्थितांचे आकर्षण ठरले. मिरवणुकीत कुकाणे व परिसरातील महिला-पुरुष भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकीचे चौकाचौकात स्वागत करण्यात आले. गणपति मंदिर परिसरात महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता झाली.

Web Title: Hanumanamurthi Pranapratishtha program

टॅग्स