गारगोटीत भाजपतर्फे  आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

गारगोटी - मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहात  मंजूर झाल्यानंतर येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करीत नागरिकांना साखर वाटप केली.

मराठा क्रांती मोर्चाच्या संयमी व शिस्तबध्द लढ्याला अखेर यश आल्याने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. युवक नेते राहुल देसाई यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन राज्य शासनाचे या निर्णयाबद्दल आभार मानले. 

भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत, देवराज बारदेस्कर, बजरंग कुरळे आदींनी राज्य शासनाच्या या महत्वाच्या निर्णयाबाबत मनोगत व्यक्त केले. या वेळी सरपंच संदेश भोपळे, शिवराज देसाई, संपत देसाई, सचिन देसाई, धनाजी कुरळे, संग्रामसिंह पोपळे, अनिल तळकर, एच. डी. देसाई, प्रदिप भाट, सुजित राणे,अरमान देसाई, एम. डी. पाटील, एम. एम. कांबळे, धनाजी मोरुस्कर, दिलीप कदम, हर्षवर्धन देसाई, बचाराम पालकर आदी उपस्थित होते.            

Web Title: Happy celebration by BJP