हापूसला कोल्हापूरात साडे सहा हजार ते साडे अकरा हजार भाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कोल्हापूर - शाहू मार्केट यार्डात कोकणी हापूस आंब्याची आवक सुरू झाली असून, मुहूर्ताचे सौदे आज जिल्हा सहकार उपनिबंधक अरुण काकडे व विशेष लेखापरीक्षक वर्गचे बी. बी. यादव यांच्या हस्ते काढले. यात आंब्याला ६ हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. बाजार समितीचे सभापती बाबासाहेब लाड व उपसभापती अमित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौदे झाले.

आंबा पूर्ण क्षमतेने बाजारपेठेत येण्यासाठी दोन महिने बाकी आहेत. तरीही सुरेश वायंगणकर (रत्नागिरी) आणि सचिन गोवेकर (देवगड) या बागायतदारांनी आंबा येथील बाजारपेठेत आणला. शाहू मार्केट यार्डातील फळ बाजारात यासिन बालमबाई बागवान व इकबाल मेहबूब बागवान यांच्या अडत दुकानात सौदे झाले. नूतन सभापती लाड यांच्या उपस्थितीत सौदे झाले. सहकार उपनिबंधक श्री. काकडे यांनी बोलीला सुरवात केली. पाच हजार रुपयांपासून भाव वाढत गेले. अखेर चार खरेदीदारांनी प्रत्येकी दोन पेट्या खरेदी केल्या. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक महिना अगोदरच हापूस आंबा बाजारपेठेत आला आहे. 

यावेळी सचिव मोहन सालपे, कृष्णात पाटील, परशुराम खुडे, सर्जेराव पाटील, उत्तम धुमाळे, शंकर येडगे, शशिकांत आडनाईक, सदानंद कोरगावकर, आनंदराव पाटील, रामचंद्र खाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Hapus Mango price more than six thousand