सांगलीच्या बाजारात हापूस दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सांगली - आंब्याला मोहोर येण्याचा काळ सुरु झाला असताना सांगलीच्या फळमार्केटमध्ये चक्क रत्नागिरी हापूस आंबा आज दाखल झाला. यंदाच्या हंगामातील फळांच्या राजाला पाहण्यासाठी विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये गर्दी झाली होती.

रत्नागिरी येथील प्रगतशील शेतकरी अमोल नारायण दाभाडे यांच्या बागेतील चालू हंगामातील पहिल्या हापूसच्या पेट्या आज विष्णुअण्णा फळ मार्केटमधील व्यापारी मुसाभाई बागवान यांच्या एमएबी दुकानात आल्या. डी. ब्रदर्स यांच्यामार्फत हा 4, 5 आणि 6 डझन अशा तीन पेट्या आल्यानंतर आंबा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. हंगामातील पहिल्या आंब्याला दर किती मिळणार याची उत्सुकता होती. दुपारपर्यंत लिलाव झाला नव्हता. त्यामुळे उत्सुकता वाढली होती.

Web Title: Hapus Mango in Sangli Market