धनगर आरक्षणाच्या पाठींब्यासाठी हार्दिक पटेल येणार

धनगर आरक्षणाच्या पाठींब्यासाठी हार्दिक पटेल येणार

आटपाडी : आरेवाडी (ता. कवठेमंकाळ) येथे बिरोबा बनात होणाऱ्या या वर्षीच्या  16 आक्टोंबरच्या दसरा मेळाव्याला पाटीदार आरक्षण लढ्याचे नेते हार्दिक पटेल प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची माहिती युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली. गोपीचंद पडळकर गेली दोन वर्षांपासून आरेवाडी येथील बिरोबा बनात धनगर समाजाचा दसरा मेळावा घेतात.

पडळकर यांनी गेल्या तीन महिन्यापासून धनगर आरक्षणाचा प्रश्नावरून लढा सुरू केला आहे. पुणे येथील मेळाव्यानंतर दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद येथे बलाढ्य मेळावा घेतला. दसरा मेळाव्यातून आरक्षण लढ्याचा तिसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. त्यासाठी या मेळाव्याला पाटीदार आरक्षण लढ्याचे नेते हार्दिक पटेल यांना निमंत्रण दिले आहे.

पटेल यांची अहमदाबाद येथे पडळकर यांनी उत्तम जानकर यांच्यासह अनेक मान्यवरांन सोबत भेट घेतली. या भेटीत दसरा मेळावा, आरक्षण, दिलेले लढे आदीवर चर्चा झाली. यावेळी पडळकर यांनी धनगर आरक्षणावर सविस्तर चर्चा केली आणि दसरा मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे निमंत्रण दिले. दसरा मेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत येऊन आरक्षण लढ्याला पाठिंबा आणि बळ देणार असल्याचे आश्वासन पटेल यांनी यावेळी दिले. दसरा मेळाव्याला हार्दिक पटेल येणार असल्याचे निश्चित झाल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com