भाजप प्रवेशास नकार देताच हसन मुश्रीफ यांच्यावर आयकरची धाड?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

कोल्हापूर : भाजपमध्ये प्रवेश करण्यास नकार देताच कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ  यांच्याच्या बंगल्यावर धाड पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांच्या कागलमधील निवासस्थानी गुरुवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली.

तब्बल पंधरा जणांचे पथक त्यांच्या घरातील विविध कागदपत्रांची माहिती घेत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर गर्दी केली आहे. मुश्रीफ यांच्या घरासह त्यांचा माद्याळ (ता. कागल) येथील खासगी साखर कारखाना, त्यांच्या पुण्यातील मुलाचे घर व टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्याही घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याने खळबळ उडाली.

मागच्या चार दिवसांपूर्वी भाजप प्रदेध्याध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याची जाहीर समारंभात ऑफर दिली होती, पण त्यांनी त्यास नकार देऊन, ''शरद पवार हेच आपला देव असल्याचे सांगितले. कर्नाटकात एकेक आमदाराला खरेदी करण्यासाठी ७० कोटी रुपये भाजपने दिले असून हा पैसा आला कोठून?,'' अशी विचारणा केली होती. त्याचा परिणाम म्हणूनच ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hasan Musharraf's income tax Raid after BJP refuses entry