चंद्रकांतदादा हो किंवा नाही काहीतरी सांगा- मुश्रीफ

सुनिल पाटील
शुक्रवार, 19 मे 2017

कोल्हापूर: दादा मुख्यमंत्र्यांना सांगून एक तर कर्जमाफी होणार म्हणून तर सांगा नाहीतर होणार नाही म्हणून तर सांगा, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आज (शुक्रवार) केली.

कागल पंचतारांकित एमआयडीसीमधील कामगारांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते प्रत्येक एक लाख रुपयांच्या निधीचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यानंतर झालेल्या चर्चेत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी महसूलमंत्र्यांशी चर्चा केली.

आमदार मुश्रीफ म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. सरकारही कर्जमाफी होणार-होणार म्हणत आहे. त्यामळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी गेल्यावर्षीच्या पीककर्जाची परतफेड केलेली नाही. सरकारही कर्जमाफी होणार किंवा नाही अशी कोणतीही घोषणा करत नाही. याचा जिल्हा बॅंकांना फटका बसत आहे. सरकारने आता जास्त वेळ न लावता कर्ज माफी होणार असेल किंवा होणार नसेल तर तशी भूमिका जाहीर करावी. सरकारच्या भूमिकेनंतर बॅंकांनी काय करावे, हे लक्षात येईल. लोक कर्जाची परतफेड करत नाहीत त्यामुळे बॅंक चालविणे अवघड झाले असल्याचे सांगून आज रात्री मुख्यमंत्र्यांसोबतही याची चर्चा करणार असल्याचेही श्री मुश्रीफ यांनी सांगितले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कर्जमाफीवर योग्य निर्णय घेतला जाईल. याबाबत मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिल्हा बॅंकेची परिस्थितीबाबत माहिती द्यावी, असे आवाहन श्री पाटील यांनी केले. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: hasan mushrif askin chandrakant patil about farmer Debt waiver