भाजप सरकारचे महाडिक बाहुले - मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत या आरोपांबद्दलची वस्तुनिष्ठता त्यांनी सांगावी; अन्यथा पाच कोटींच्या बदनामीच्या खटल्याला सामोरे जाण्याची तयारी करावी,’ असे पत्रक आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.

कोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत या आरोपांबद्दलची वस्तुनिष्ठता त्यांनी सांगावी; अन्यथा पाच कोटींच्या बदनामीच्या खटल्याला सामोरे जाण्याची तयारी करावी,’ असे पत्रक आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.

त्यांनी त्यात म्हटले आहे, की गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने पोटनियमांत बदल करून, तो मल्टिस्टेट करण्याचा निर्णय घेतला आहे. एका विशिष्ट वळणावर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. याचा अर्थ हा संघ मल्टिस्टेट करून घशात घाला असा नव्हे. जिल्ह्याचा स्वाभिमान आणि अस्मिता असलेला गोकुळ मल्टिस्टेट करण्याला जिल्ह्यातूनच तीव्र विरोध आहे. या जनतेच्या भावना मीही व्यक्त केल्या आहेत. ते माझे वक्तव्य महाडिक यांच्या मनाला का लागावे, असा सवालही त्यांनी केला. 

मुश्रीफ यांनी म्हटले आहे, की महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वी आणि आजही महानंदा दूध संघामध्ये हैदराबादची तीनशे मुले भरल्याचा आरोप माझ्यावर केला. आजच्या घडीला महानंदामध्ये भाजप सरकारची सत्ता असून तेथे एकनाथ खडसेंच्या पत्नी अध्यक्षा आहेत. त्या मुलांची नावे त्यांनी जाहीर करावीत. जिल्हा बॅंकेच्या संचालकांचा मॉरिशस व हैदराबाद दौरा स्वखर्चाने झाला आहे. बॅंकेमध्ये आतापर्यंत हार्डवेअरची खरेदीच झाली नाही. त्यांनी कधीही या विषयांची सीआयडी चौकशी लावावी आणि खर्च स्पॉन्सर्ड होता की व्यक्तिगत होता, हे शोधावे.  

केडीसी बॅंकेतून माझ्या मुलाच्या नावावर विमा घेतला जातो, असा आरोप करणाऱ्या महाडिक यांनी अजूनही माहिती घेऊन बोलावे. आपले झाकण्यासाठीच माझी बदनामी करण्याचा महाडिक यांचा डाव कदापिही चालू देणार नाही, असा इशाराही दिला. कागल शाखेतील अपहार केल्याचे वारंवार सांगून शिळ्या कढीलाच ऊत दिला जात आहे. महाडिक यांचे गोकुळ दूध संघातील गैरव्यवहार व व्यक्तिगत धंदे बाहेर काढावयाचे झाल्यास एक भलीमोठी कादंबरी तयार होईल. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असा टोलाही लगावला आहे.

मला स्वतःचीच लाज वाटली...
गोकुळमधून महाडिक यांना कोणकोणते फायदे मिळतात, हे जिल्ह्यातील बच्चा बच्चा जानता है. आयुष्यात मी नोकरभरतीत साधा चहासुद्धा पिऊन लाजीम झालो नाही; परंतु नुकत्याच झालेल्या गोकुळच्या भरतीमध्ये पंधरा ते वीस लाख रुपये घेऊन यांनी दुकान उघडले. हे ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली. ज्या मुलांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, त्यांनी नोकरीसाठी घरदार तारण ठेवून आई आणि पत्नीच्या अंगावरील दागिने विकून पैसे दिल्याचे ऐकून मी तर अवाक्‌च झाल्याचेही मुश्रीफ यांनी म्‍हटले आहे. 

Web Title: Hasan Mushrif comment