चंद्रकांतदादा, तुमचीच झोप उडाली आहे - हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सेनापती कापशी - ‘‘राज्यात तुमचे दुसऱ्या क्रमांकाचे पद असूनही कोल्हापूर महापालिका, जिल्हा बॅंक, बाजार समिती येथे आमदार हसन मुश्रीफ यांनीच सत्ता पटकावली. याशिवाय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सत्ता केवळ अपघाताने गेली. यामुळे चंद्रकांतदादा, तुमचीच झोप उडाली आहे,’’ असा पलटवार आमदार मुश्रीफ यांनी केला. आलाबाद (ता. कागल) येथे रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘चंद्रकांत पाटील यांनी कागल मतदारसंघ निवासस्थान करावे; पण ८० टक्के मी पूर्ण केलेल्या नागरवाडी, आंबेओहळ प्रकल्प व गडहिंग्लज हद्दवाढ या माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून मूलभूत हक्काच्या कामात हस्तक्षेप करू नये. जोपर्यंत गोरगरीब, दलित, मजूर माझ्या मागे आहेत तोपर्यंत ही कवच-कुंडले घेऊन मी रणांगणात असेन. गरिबांच्या विरोधातील सरकारला जागे करण्यासाठी जानेवारीपासून अनेक 
प्रश्‍नांसाठी महिला मेळावे सुरू करणार आहे. चंद्रकांत पाटील नशीबवान आहेत. त्यांना राज्यात दुसऱ्या क्रमांकाची खाती मिळाली; तरीही त्यांना चार वर्षात जिल्ह्याला निधी देता आणता आला नाही. मी विधानभवनावर धडक मोर्चा काढला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी २२० कोटी रुपये निधी दिला.’’

शशिकांत खोत म्हणाले, ‘‘चार वर्षात या सरकारमुळे तालुक्‍यात लोकांचे सुखसमाधान हरवले. म्हणून या निवडणुकीवेळी जागृत राहू आणि खोटरड्या सरकारला सत्तेतून दूर करू.’’

कापशी ते मुरगूड आणि आलाबाद ते कासारी या साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाला. जे. डी. मुसळे, शामराव पाटील, दत्तात्रय चव्हाण, पोपट सांगले, श्रीपती शिंत्रे, अंकुश पाटील आदी उपस्थित होते. दिनेश मुसळे यांनी स्वागत केले.

ही कसली हौस? 
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘माझ्याकडे आता सायरन नाही, तरीही लोक जमले आहेत; मात्र शेंडूर येथे अनेक सायरन वाजले; पण खुर्च्या रिकाम्या होत्या. कधी नव्हे ते म्हाडाचे पद मिळाले, पण लाल दिवा गेला. तरीही त्यांनी गाडीच्या डॅशबोर्डवर लाल दिवा ठेवला. कुठेच दिवा नसताना टीका करणाऱ्यांची ही कसली हौस म्हणायची.’’

Web Title: Hasan Mushrif comment