खासदार महाडिकांनाच निवडून देण्याचे मुश्रीफ यांचे आवाहन

खासदार महाडिकांनाच निवडून देण्याचे मुश्रीफ यांचे आवाहन

उत्तूर -  लोकसभेसाठी खासदार धनंजय महाडिक यांना आणि विधानसभेसाठी मला पुन्हा निवडून द्या, कोणत्याही स्थितीत रखडलेला आंबेओहळ प्रकल्प वर्षात पूर्ण करू, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ अंतर्गत गावांचा मेळावा झाला. उज्ज्वला वसंतराव धुरे अध्यक्षस्थानी होत्या. मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘तीस-पस्तीस वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत गोरगरीब माणूस विशेषतः माता-भगिनी नजरेआड होऊ दिल्या नाहीत. राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार थापाड्यांचे आहे.’’

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘पाच वर्षांपूर्वी मोदी लाट असतानाही केवळ गोरगरिबांच्या आशीर्वादावर मी मोठ्या मतसंख्येने निवडून आलो. पाच वर्षांत संसदेत जिल्ह्याचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित रखडलेले प्रश्‍न आणि प्रकल्प मार्गी लावले. एकूण एक हजार १२५ प्रश्‍न मांडण्याबरोबरच या कामाची पोचपावती म्हणून सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. त्यामुळे जनतेने मला पुन्हा संधी द्यावी.’’

आमदार संध्यादेवी कुपेकर, अमरीन नवीद मुश्रीफ, आजरा सभापती रचना होलम आणि चिमणे येथील वैदेही तांबेकर यांचीही भाषणे झाली.

वसंतराव धुरे यांनी स्वागत केले. काशीनाथ तेली यांनी प्रास्ताविक केले. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन केले. आजरा उपसभापती शिरीष देसाई यांनी आभार मानले.

चंद्रकांतदादा फाईलवर सही करा
भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आंबेओहळ प्रकल्प रखडला असे सांगून मुश्रीफ म्हणाले, ‘‘भागाला वरदान ठरणाऱ्या आंबेओहळ सर्फनाला आणि उचंगी प्रकल्पांच्या पुनर्वसनाची फाईल पुनर्वसनमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांच्या टेबलावर धूळ खात आहे. फाईलवर सही करण्यास त्यांचा हात का जड होत आहे, असा प्रश्‍न पडला आहे. दादा, त्या फाईलवर सही करा आणि गोरगरिबांच्या कल्याणाचे काम करा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com