आमच्या गाडीचे टायर लोखंडी आहेत : मंत्री हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Political comment On Chandrakant Patil, Kolhapur Marathi News
Hasan Mushrif Political comment On Chandrakant Patil, Kolhapur Marathi News

उत्तूर : आमच्या गाडीचे टायर लोखंडी आहेत. त्यामुळे ते बदलण्याचा प्रश्‍नच येत नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला. काही दिवसापुर्वी चंद्रकांत पाटील यांनी "हे सरकार गाडीचे टायर बदलतात तसे बदलेल' असे वक्तव्य कोल्हापूर येथील कार्यक्रमात केले होते. त्याला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले. उत्तूर (ता.आजरा) येथे नागरीकांतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली यांनी स्वागत केले. 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ""गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या काळात जनतेचे प्रचंड हाल झाले. विकास कामासाठी निधी मिळाला नाही. काही जनांची पेन्शन रद्द केली. आरोग्याचे प्रश्‍न सुटले नाही. पिण्याचे पाणी मिळाले नाही. यामुळे जनतेने या सरकारला नाकारले. आता महाआघाडीची सत्ता आली आहे. यामुळे जनतेचे सर्व प्रश्‍न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. या परिसरातील आंबेओहळ प्रकल्प पुर्ण करणे, गावागावातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, पानंदी दुरुस्त करणे या विकास कामांना प्राधान्य देणार आहे.'' 

या वेळी मारूतीराव घोरपडे, शिरीष देसाई, बी. टी. जाधव, दिपक देसाई, रामदास आजगेकर, पी. डी. भाकरे, अनिल चव्हाण, राजू चव्हाण, संभाजी तांबेकर, विजय वांगणेकर, विठ्ठल उत्तूरकर, भैरू सावंत व परिसरातील 25 गावातील नागरीक उपस्थित होते. सुधीर सावंत यांनी आभार मानले. सरपंच वैशाली आपटे व जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, साखर कारखान्याचे माजी संचालक विश्‍वनाथ करंबळी, सरपंच संघटनेचे कार्यकर्ते मारुती मोरे, राजू पोतनीस व आजरा तालुक्‍यातील विविध संस्थेच्या पदाधिकारी यानी मत्री मुश्रीफ यांचा सत्कार केला. 

जनता दरबार आयोजित करणार 
जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार आयोजित करणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थित यावेळी जनतेचे प्रश्‍न सोडवणे, त्यांच्या अडचणी समजावून घेणार असल्याची घोषणा मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com